‘गोटया’ने जिंकली प्रेक्षकांची मने!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2018 06:42 AM2018-07-08T06:42:43+5:302018-07-08T06:43:04+5:30

खेळावर आधारीत चित्रपट सर्वांनाच आवडतात. असे चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक आतूर असतात. आज विविध खेळांना केंद्रस्थानी ठेवून सिनेमांची निर्मिती केली जात आहे, या सर्वांमध्ये ‘गोटया’ हा खेळही रुपेरी पडद्यावर पाहायला मिळेल अशी कल्पनाही कधी कोणी केली नसेल

 Gotya won the views of the audience! | ‘गोटया’ने जिंकली प्रेक्षकांची मने!

‘गोटया’ने जिंकली प्रेक्षकांची मने!

googlenewsNext

खेळावर आधारीत चित्रपट सर्वांनाच आवडतात. असे चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक आतूर असतात. आज विविध खेळांना केंद्रस्थानी ठेवून सिनेमांची निर्मिती केली जात आहे, या सर्वांमध्ये ‘गोटया’ हा खेळही रुपेरी पडद्यावर पाहायला मिळेल अशी कल्पनाही कधी कोणी केली नसेल ‘गोटया’ सारखा दुर्लक्षित खेळ नुकताच रुपेरी पडद्यावर आल्याने अनेकांच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देणाऱ्या ‘गोटया’ चित्रपटाला प्रेक्षकांनी
पसंती दर्शवली आहे. लहानांसोबत मोठ्यांनाही हा सिनेमा चांगलाच भावतोय. या मैदानी खेळांमध्ये एक गंमत असायची. ही गंमत आजच्या मुलांना अनुभवण्याची संधी ‘गोटया’ चित्रपटाने दिली असल्याची भावना प्रेक्षकांकडून व्यक्त होत आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, ओरंगाबाद, कोल्हापूर या शहरांतून चित्रपटाला विशेष प्रतिसाद मिळत आहे. १५० हून अधिक चित्रपटगृहांतून प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाबाबत शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता पहायला मिळतेय. ‘गोटया’ या खेळाला योग्य मानसन्मान मिळवून देण्याच्या उद्देशाने निर्माते जय केतनभाई सोमैया व दिग्दर्शक भगवान वसंतराव पाचोरे यांनी हा चित्रपट आत्मियतेने पडद्यावर साकारला आहे. चित्रपटाचे कथानक गोटया खेळावर अपार प्रेम असलेल्या एका मुलावर आधारित आहे. आजची पिढी संगणक आणि मोबाईल गेममध्ये गुरफटली आहे. या मैदांनी खेळाबाबत निराशाजनक स्थिती आहे. ‘गोटया’ या चित्रपटाद्वारे ही स्थिती बदलता येऊ शकते हे सांगण्याचा प्रयत्न करीत ह्यगोटयाह्ण खेळाचा सुरेख कॅलिडोस्कोप या चित्रपटात मांडण्यात आला आहे. जय केतनभाई सोमैया निर्मित व दिग्दर्शक भगवान वसंतराव पाचोरे दिग्दर्शित ‘गोटया’ चित्रपटात ऋषिकेश वानखेडे, राजेश श्रृंगारपुरे, सयाजी शिंदे, आनंद इंगळे, कमलाकर सातपुते, सुरेखा कुडची, हेमांगी राव, शरद सांखला, शशांक दरणे, पोर्णिमा अहिरे या कलाकारांच्या भूमिका आहेत. केतनभाई सोमैया प्रस्तुत, विहान प्रोडक्शन आणि द्वारा मोशन पिक्चरची निर्मिती असलेल्या या चित्रपटाची कथा-पटकथा-संवाद-गीतलेखन-दिग्दर्शन भगवान पाचोरे यांनी केलं आहे.

Web Title:  Gotya won the views of the audience!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.