सरकारची भूमिका मांडणारा ‘सरकार 3’!

By Admin | Published: May 12, 2017 01:20 AM2017-05-12T01:20:55+5:302017-05-12T01:20:55+5:30

रामगोपाल वर्मा दिग्दर्शित ‘सरकार ३’ हा बहुप्रतीक्षित सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस आलाय.‘सरकार ३’ पाहून प्रेक्षकांना नव्या रामगोपाल वर्माने जन्म घेतला,

'Government 3' that raises the role of the government! | सरकारची भूमिका मांडणारा ‘सरकार 3’!

सरकारची भूमिका मांडणारा ‘सरकार 3’!

googlenewsNext

रामगोपाल वर्मा दिग्दर्शित ‘सरकार ३’ हा बहुप्रतीक्षित सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस आलाय.‘सरकार ३’ पाहून प्रेक्षकांना नव्या रामगोपाल वर्माने जन्म घेतला, असे वाटेल, हे शब्द आहेत, अभिनेता मनोज वाजपेयी याचे. मनोज वाजपेयी याचे हे शब्द किती खरे ठरतात, हे लवकरच कळेल. पण दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांनी ‘सरकार ’ सीरिजचे ‘सरकार ’ व ‘सरकारराज’ हे दोन्ही सिनेमे प्रेक्षकांच्या मनात अजूनही जिवंत आहेत. त्यामुळेच ‘सरकार ३’कडून प्रेक्षकांना बरीच अपेक्षा आहे.
२००५ मध्ये रामगोपाल यांचा ‘सरकार’ हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. ‘द गॉडफादर’ या हॉलिवूड सिनेमावर बेतलेल्या या सिनेमात अमिताभ बच्चन आणि त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन या पिता-पुत्राची जोडी एकत्र दिसली होती.
के. के. मेनन याचीही यात महत्त्वपूर्ण भूमिका होती. सुभाष नागरे नावाच्या मुंबईतील एका बलाढ्य व लोकप्रिय व्यक्तीची आणि त्याच्या कुटुंबाची कथा यात रेखाटली गेली होती.
रामगोपाल यांचा हा पॉलिटिकल ड्रामा आला आणि बॉक्सआॅफिसवर सुपरहिट झाला. विशेषत: अमिताभ यांनी पडद्यावर जिवंत केलेली सुभाष नागरेची भूमिका अफलातून ठरली. तिकीट बारीवर हा चित्रपट यशस्वी ठरल्यानंतर रामगोपाल यांनी या चित्रपटाचा सिक्वल बनवण्याचा निर्णय घेतला.
त्यानुसार, २००८ मध्ये ‘सरकारराज’ नावाचा सिनेमा आला. या सिक्वलमध्येही पुन्हा अमिताभ आणि अभिषेक ही पितापुत्राची जोडी रिपीट झाली. केवळ एवढेच नाही, तर अमिताभ व अभिषेक यांच्या जोडीला ऐश्वर्या रायही दिसली. या चित्रपटातही अमिताभ यांनी सुभाष नागरेची मध्यवर्ती भूमिका साकारली.
सरकार सीरिजमधील हा दुसरा चित्रपटही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. आता पुन्हा एकदा तब्बल ९ वर्षांनंतर येणाऱ्या ‘सरकार ३’ सीरिजच्या तिसऱ्या भागात म्हणजेच ‘सरकार ३’ मध्ये ही सगळी कसर भरून काढण्याचे त्यांनी ठरवले आहे. कुठलीही रिस्क न घेता, वर्मा यांनी या चित्रपटाचे लेखन आणि संवाद यावर भरपूर मेहनत केली आहे. ‘सरकार ३’ मध्ये पुन्हा एकदा अमिताभ यांची वर्णी लागली आहे. हा चित्रपट शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित असल्याचे बोलले जाते आहे. पण वर्मा यांनी हा दावा नाकारला आहे. ‘सरकार ३’चे बाळासाहेब ठाकरे यांचे या चित्रपटाशी काहीही देणेघेणे नाही. मात्र हा चित्रपट त्यांच्यामुळे प्रभावित आहे, असे वर्मा यांनी म्हटले आहे.

Web Title: 'Government 3' that raises the role of the government!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.