Govinda Naam Mera : बाथटबमध्ये विकी कौशल-कियारा अडवाणीचा ‘रोमान्स’, पाहून क्रेझी झालेत फॅन्स

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2022 04:42 PM2022-11-29T16:42:57+5:302022-11-29T16:43:19+5:30

विकी कौशल (Vicky Kaushal) तरूणाईचा लाडका अभिनेता. विकी नुकताच कतरिना कैफसोबत लग्नबंधनात अडकला. पण सध्या विकी व कतरिना नाही तर विकी व कियारा अडवाणीची (  Kiara Advani )चर्चा आहे.

Govinda Naam Mera Song Bana Sharabi Teaser Vicky Kaushal Kiara Advani romance | Govinda Naam Mera : बाथटबमध्ये विकी कौशल-कियारा अडवाणीचा ‘रोमान्स’, पाहून क्रेझी झालेत फॅन्स

Govinda Naam Mera : बाथटबमध्ये विकी कौशल-कियारा अडवाणीचा ‘रोमान्स’, पाहून क्रेझी झालेत फॅन्स

googlenewsNext

विकी कौशल (Vicky Kaushal) तरूणाईचा लाडका अभिनेता. विकी नुकताच कतरिना कैफसोबत लग्नबंधनात अडकला. पण सध्या विकी व कतरिना नाही तर विकी व कियारा अडवाणीची (  Kiara Advani )चर्चा आहे. होय, दोघांचा ‘गोविंदा नाम मेरा’ (Govinda Naam Mera ) हा सिनेमा येतोय आणि या सिनेमात विकी व कियाराची रोमॅन्टिक केमिस्ट्री बघण्यासारखी आहे. विश्वास बसत नसेल तर या सिनेमाच्या गाण्याचा हॉट टीझर तुम्ही बघायलाच हवा.

या गाण्यात विकी व कियाराने जबरदस्त इंटिमेट सीन्स दिले आहे. गाण्याचा टीझर रिलीज झाला आहे आणि या गाण्यात विकी व कियाराचा रोमान्स पाहून चाहते क्रेझी झाले आहेत. अनेकजण यावरून कतरिनाची मजा घेतानाही दिसत आहेत.

गाण्याचा टीझर विकीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. हा टीझर आऊट झाला आणि चाहत्यांनी कमेंट बॉक्समध्ये कतरिनाची मजा घ्यायला सुरूवात केली. ‘जो तूने पिलाई हुआ शराबी’ अशी गाण्याची एकच ओळ टीझरमध्ये ऐकायला मिळतेय. पण चाहते ही एक ओळ ऐकूनच खुश्श झाले आहेत. हे गाणं कधी एकदा रिलीज होतं, असं चाहत्यांना झालं आहे. गाण्यात कियारा ब्लॅक बिकिनी टॉप व ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये आहेत. तर विकी ब्लॅक शर्ट व पँटमध्ये आहे. हे गाणं जुबिन नौटियालने गायलं असून तनिष्क बागची याने या गाण्याला संगीत दिलं आहे. उद्या 30 नोव्हेंबरला हे गाणं रिलीज होतंय.

चित्रपटाचं म्हणाल तर 16 डिसेंबरला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. डिज्नी प्लस हॉटस्टारवर हा सिनेमा तुम्हाला बघता येणार आहे. यात विकी व कियारासोबत भूमी पेडणेकर लीड रोलमध्ये आहे.

Web Title: Govinda Naam Mera Song Bana Sharabi Teaser Vicky Kaushal Kiara Advani romance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.