व्यसनाला असलेली भिकार प्रतिष्ठा...! दारूच्या दुकानाबाहेरच्या रांगा पाहून ‘धुरळा’ लेखकाची पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2020 03:18 PM2020-05-04T15:18:01+5:302020-05-04T15:20:52+5:30
तुफान व्हायरल होतेय पोस्ट...
कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन आणखी दोन आठवड्यांसाठी वाढवण्यात आला. पण या तिस-या लॉकडाऊनदरम्यान काही नियमांत शिथिलता देण्यात आली. लॉकडाऊनच्या या तिस-या टप्प्यात दारूची दुकाने उघडण्याचीही सशर्त परवानगी दिली गेली. पण हे काय, आज दारूची दुकानं उघडणार म्हटल्यावर दारूंच्या दुकानाबाहेर मद्यप्रेमींच्या लांबच लांब रांगा लागल्या. इतकेच नाही तर या मद्यप्रेमींना सोशल डिस्टंसिंगचाही विसर पडला. अनेक ठिकाणी तळीरामांनी इतकी गर्दी केली की, त्यांना आवरता आवरता पोलिसांच्याही नाकीनाऊ आले. या सगळ्यांवर आता प्रतिक्रिया येणे सुरु झाले आहे़. ‘धुरळा’चे लेखक क्षितीज पटवर्धन यांनी यावर अतिशय परखड प्रतिक्रिया नोंदवली आहे.
‘व्यसनाला असलेली भिकार प्रतिष्ठा आणि सो कॉल्ड कुलनेस सगळ्यांना घेऊन बुडणार एक दिवस. किलोमीटर भर रांगा लागल्यात दारूच्या दुकानाबाहेर,’ अशी पोस्ट क्षितीज यांनी फेसबुकवर लिहिली आहे.
#WATCH: Police resorts to mild lathicharge outside a liquor shop in Kashmere Gate after social distancing norms were flouted by people outside the shop. #Delhipic.twitter.com/XZKxrr5ThC
— ANI (@ANI) May 4, 2020
क्षितीज यांची ही पोस्ट सध्या तुफान व्हायरल होतेय. अनेकांनी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहे. ‘पहिल्यांदा वाटले कांदे, बटाटे घेण्यासाठी दुकान उघडण्याआधीच इतकी मोठी रांग लागली आहे. कांदे, बटाटे जीवनावश्यक गोष्टींमध्ये येतात. ते कुठेही मिळतीलच. पण मग याच दुकानासमोर एवढी गर्दी कशासाठी? असा प्रश्न मनात आला आणि काही क्षणातच प्रश्नाचे उत्तर मिळाले. एकच प्याला,’ असे एका युजरने क्षितीज यांच्या पोस्टवर कमेंट करताना लिहिले आहे़.