Grammy Awards 2024: शंकर महादेवन आणि झाकीर हुसैन यांनी ग्रॅमी अवॉर्डवर उमटवली मोहोर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2024 10:17 AM2024-02-05T10:17:01+5:302024-02-05T10:19:27+5:30
ग्रॅमी अवॉर्ड सोहळ्यात गायक शंकर महादेवन आणि तबलावादक झाकीर हुसैन यांच्या 'शक्ती' या फ्युजन बँडने बाजी मारली आहे.
यंदाच्या ग्रॅमी अवॉर्ड सोहळा भारतीयांसाठी खास ठरला आहे. या अवॉर्ड सोहळ्यात गायक शंकर महादेवन आणि तबलावादक झाकीर हुसैन यांच्या 'शक्ती' या फ्युजन बँडने बाजी मारली आहे. ग्रॅमी अवॉर्ड २०२४मधील बेस्ट ग्लोबल म्युझिक अल्बम अवॉर्ड त्यांना मिळाला आहे. त्यामुळे ग्रॅमी अवॉर्ड सोहळ्यात भारताची मान उंचावली आहे.
ग्रॅमी अवॉर्ड हा संगीत क्षेत्रातील मानाचा पुरस्कार मानला जातो. रविवारी रात्री ८:३० वाजता म्हणजेच भारतीय वेळेनुसार सकाळी ६:३० वाजण्याच्या सुमारास या अवॉर्ड सोहळ्याची सुरुवात झाली. या अवॉर्ड सोहळ्यातील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. Xवरुन ग्रॅमी अवॉर्ड सोहळ्यातील शंकर महादेवन आणि झाकीर हुसैन यांच्या शक्ती बँडला पुरस्कार मिळाला त्या क्षणाचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.
Congrats Best Global Music Album winner - 'This Moment' Shakti. #GRAMMYs 🎶
— Recording Academy / GRAMMYs (@RecordingAcad) February 4, 2024
WATCH NOW https://t.co/OuKk34kvdupic.twitter.com/N7vXftfaDy
शंकर महादेवन आणि झाकीर हुसैन यांच्यासह चार जणांनी ग्रॅमी अवॉर्डवर मोहोर उमटवली आहे. शक्ति या अल्बमसाठी शंकर महादेवन आणि झाकीर हुसैन यांच्याबरोबरच सेल्वगणेश विनायकराम आणि गणेश राजगोपालन यांनाही ग्रॅमी अवॉर्ड मिळाला आहे. झाकीर हुसैन यांना 'पाश्तो'साठी 'बेस्ट ग्लोबल म्युझिक परफॉर्मन्स' हा ग्रॅमीचा अवॉर्डही मिळाला.