गायिका ज्योत्स्ना भोळेंना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन..

By Admin | Published: August 5, 2016 09:33 AM2016-08-05T09:33:03+5:302016-08-05T09:41:19+5:30

मराठी गायिका व संगीत रंगभूमीवरील अभिनेत्री ज्योत्स्ना भोळे यांचा आज ( ५ ऑगस्ट) स्मृतिदिन.

Greetings by singer Jyotsna Bholena | गायिका ज्योत्स्ना भोळेंना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन..

गायिका ज्योत्स्ना भोळेंना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन..

googlenewsNext
प्रफुल्ल गायकवाड
मुंबई, दि. ५ -    मराठी  गायिका व संगीत रंगभूमीवरील अभिनेत्री ज्योत्स्ना भोळे यांचा आज ( ५ ऑगस्ट) स्मृतिदिन. 
                                                      
ज्योत्स्ना भोळे (पूर्वाश्रमीच्या दुर्गा केळेकर) यांचा जन्म ११ मे १९१४ साली झाला. संगीतकार केशवराव भोळे हे त्यांचे पती होते. केशवराव भोळे यांनी इ.स.१९३३ साली ’नाट्यमन्वंतर’ नावाची नाट्यसंस्था काढली. आंधळ्याची शाळा हे त्यांचे पहिले नाटक. याचा प्रथम प्रयोग १ जुलै १९३३ रोजी मुंबईच्या रिपन थिएटरमध्ये झाला होता. या नाटकात ज्योत्स्ना भोळे यांनी नायिकेची(बिंबाची) भूमिका केली होती. त्या नाटकात नाटककार श्री.वि.वर्तक यांच्या पत्नी सौ पद्मावती वर्तक, म.रा. रानडे, पार्श्वनाथ आळतेकर,  के. नारायण काळे, ल.भ. केळकर, माधवराव प्रभू, नामजोशी, हर्डीकर यांनीही भूमिका केल्या होत्या. या नाटकाचे त्या काळात शंभराच्यावर प्रयोग झाले. बहुसंख्य प्रयोग पुणे-मुंबईत होते. ’आंधळ्यांची शाळा’ हे नाटक जगप्रसिद्ध नाटककार इब्सेन याचा साडू असलेल्या ब्यर्सन याने लिहिलेल्या ’ग्वॉन्टलेट’ या नाटकाचे मराठी भाषांतर होते. ज्योत्स्नाबाई त्या नाटकाच्या वेळी फक्त १८ वर्षांच्या होत्या.
 
कंठसंगीतासाठी इतर गायिकांपेक्षा अगदी वेगळा असा ज्योत्स्नाबाईंचा खास आवाज होता. त्यामुळे त्यांनी गायलेली नाटकांतली गाणी अजरामर झाली.
 
ज्योत्स्ना भोळे यांचे ’कुलवधू’ हे नाटक आणि त्यातले ’बोला अमृत बोला’ हे गाणे फार गाजले. ज्योत्स्नाबाईंच्या स्मृतिप्रीत्यर्थ होणार्‍या कार्यक्रमाचे नावही ’बोला अमृत बोला’ असे असते.
 
ज्योत्स्ना भोळे यांची भूमिका असलेली नाटके आणि त्यातील त्यांच्या भूमिका
अलंकार (वत्सला)
आंधळ्यांची शाळा (बिंबा)
आराधना (देवकी)
आशीर्वाद (सुमित्रा)
एक होता म्हातारा (उमा)
कुबेर (चित्रपट ?)
कुलवधू (भानुमती)
कोणे एके काळी (कल्याणी)
तुझं माझं जमेना (?)
धाकटी आई (वीणा)
भाग्योदय (भानुमती)
भूमिकन्या सीता (सीता)
रंभा (सुगंधा)
राधामाई (राधा)
विद्याहरण ( देवयानी)
लपंडाव 
 
ज्योत्स्ना भोळे यांची गाजलेली गीते, भावगीते आणि नाट्यगीते
आला खुशीत्‌ समिंदर (कोळीगीत कवी अनंत काणेकर, संगीत केशवराव भोळे)
ऊठ मुकुंदा हे गोविंदा (नाट्यगीत)
एकलेपणाची आग लागली (नाट्यगीत)
कां रे ऐसी माया (नाट्यगीत)
किती वयाचे धराल भय (नाट्यगीत)
खेळेल का देव माझिया (नाट्यगीत)
छंद तुझा मजला का (नाट्यगीत-राग पिलू-नाटक एक होता म्हातारा; कवी मो.ग.रांगणेकर; संगीत मास्टर कृष्णराव)
जाई परतोनी बाळा (नाट्यगीत)
झाली पहाट झाली पहाट तुझं नि माझं जमेना (नाट्य/द्वंद्वगीत-तुझं माझं जमेना(एकांकिका). कवी मो.ग.रांगणेकर, संगीत श्रीधर पार्सेकर)
तू माझी अन्‌ तुझा मीच (नाट्यगीत)
दे मज देवा जन्म हा (नाट्यगीत)
देवा बोला हो माझ्याशीनको वळुन बघू माघारी (कोळीगीत)
नाच हृदया आनंदे (नाट्यगीत)
बहु असोत सुंदर (महाराष्ट्रगीत. कवी श्रीपाद कृष्ण कोल्हटकर. संगीत शंकरराव व्यास). हे गीत ललिता फडके आणि व्ही.जी.भाटकर यांनीही गायले आहे.
बोला अमृत बोला (नाट्यगीत-कुलवधू. संगीत मास्टर कृष्णराव)मनरमणा मधुसूदना (नाट्यगीत-कुलवधू. संगीत मास्टर कृष्णराव)
मराठी असे आमुची (गीत. कवी माधव ज्युलियन)
माझिया माहेरा जा (भावगीत)
मानसी राजहंस पोहतो (नाट्यगीत)
मी पुन्हा वनांतरी फिरेन (नाट्यगीत)
मी राधा मीच कृष्ण (कविता)(कवी गो.नी.दांडेकर; संगीत स्नेहल भाटकर)
ये झणि ये रे माघारी (नाट्यगीत)
रुसली राधा रुसला माधव (नाट्यगीत)
शुभमंगल या समया (चित्रपट-कुबेर; कवि-निर्माते मो. ग. रांगणेकर, संगीत दिग्दर्शन केशवराव भोळे)
सुखद या सौख्याहुनि (नाट्यगीत)
हा कोण गडे आला (चित्रपट-कुबेर; कवि-निर्माते मो. ग. रांगणेकर, संगीत दिग्दर्शन केशवराव भोळे)
होईल का हे स्वप्‍न खरेहांस हांस रे हृदया (नाट्यगीत)
क्षण आला भाग्याचा (नाट्यगीत-कुलवधू. संगीत  मास्टर कृष्णराव)
 
अन्य
ज्योत्स्ना भोळे यांनी ’आराधना’ नावाच्या नाटकाचे नाट्यलेखन केले आहे.त्या अनेक वर्षे ’महाराष्ट्र कल्चरल सेंटर’च्या अध्यक्षा होत्या.अखिल भारतीय नाट्य परिषद ज्योत्स्ना भोळे यांच्या नावाने दरवर्षी पुरस्कार देते. 
१९७८साली हा पुरस्कार रत्‍नाकर मतकरी यांना मिळाला होता.
ज्योत्स्ना भोळे यांना १९९९ साली महाराष्ट्र सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार मिळाला होता.दया डोंगरे यांना २००८ साली अखिल भारतीय नाट्य परिषदेचे महाराष्ट्र सरकार पुरस्कृत ज्योत्स्ना भोळे पारितोषिक मिळाले होते.विद्या काळे यांना २०१०मध्ये अखिल भारतीय नाट्य परिषदेचे ज्योत्स्ना भोळे गौरव पारितोषिक मिळाले होते.पुणे महापालिकेतर्फे देण्यात येणारा 'बालगंधर्व' पुरस्कार ज्योत्स्ना भोळे यांना मिळाला होता.
 
आत्मचरित्र
अनुबंध प्रकाशनाने ज्य़ोत्स्ना भोळे यांचे आत्मचरित्र ’तुमची ज्योत्स्ना भॊळे’ या नावाने प्रकाशित केले आहे. पुस्तकाची दुसरी आवृत्ती ११-५-२०१३ला प्रकाशित झाली.ज्योत्स्ना भोळे यांच्यावर एक लघुपटही निघाला आहे.
 
जन्मशताब्दी
ज्योत्स्ना भोळे यांचा जन्मशताब्दी सोहळा ११ मे २०१३ रोजी पणजी येथे दीनानाथ कलामंदिरात झाला.
 
ज्योत्स्ना भोळे सभागृह
पुणे शहरात हिराबाग येथील उद्योगभवनाच्या इमारतीत महाराष्ट्र कल्चरल सेंटरच्या मालकीच्या सभागृहाला ज्योत्स्ना भोळे यांचे नाव देण्यात आले आहे. सभागृहात एक लाकडी रंगमंच असून ३००हून थोड्या अधिक प्रेक्षकांची बसण्याची सोय आहे. संगीताच्या मैफिली, चर्चा परिसंवाद व व्यावसायिक कॉन्फरन्स आदींसाठी या सभागृहात पुरेशा सुविधा आहेत.
 
५ ऑगस्ट २००१ साली ज्योत्स्ना भोळे यांचे निधन झाले.
 
सौजन्य : मराठी विकिपीडिया 

 

Web Title: Greetings by singer Jyotsna Bholena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.