घरात नव्हता अन्नाचा एक दाणा, अनेक रात्री काढल्या उपाशी राहून; आज आहे कोटयवधींचा मालक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2023 02:01 PM2023-09-20T14:01:55+5:302023-09-20T14:03:06+5:30

Bollywood actor: बराच काळ उपाशी राहिल्यामुळे त्यांना अनेक शारीरिक व्याधींचा सामना करावा लागला होता.

guess-who-dharmendra-childhood-photos-actor-once-take-isabgol-powder-to-satisfy-hunger-during-struggling-days | घरात नव्हता अन्नाचा एक दाणा, अनेक रात्री काढल्या उपाशी राहून; आज आहे कोटयवधींचा मालक

घरात नव्हता अन्नाचा एक दाणा, अनेक रात्री काढल्या उपाशी राहून; आज आहे कोटयवधींचा मालक

googlenewsNext

कलाविश्वात असे अनेक दिग्गज कलाकार पाहायला मिळतात ज्यांनी स्वकर्तृत्वावर कलाविश्वात त्यांचं हक्काचं स्थान निर्माण केलं. परंतु, त्यांचा हा प्रवास सोपा नव्हता. अनेक कलाकारांनी कित्येक रात्र उपाशीपोटी, चंद्राच्या सावलीखाली झोपून काढल्या आहेत. सध्या सोशल मीडियावर बॉलिवूडच्या अशाच एका दिग्गज अभिनेत्याच्या स्ट्रगल काळ चर्चेत आला आहे. या अभिनेत्याने आज कलाविश्वात त्यांच हक्काचं स्थान निर्माण केलं. इतंकच नाही तर त्याची पत्नी, मुलगी आणि दोन्ही मुलं सुद्धा आज कलाविश्वात भक्कम स्थान निर्माण करुन आहेत.

सध्या नेटकऱ्यांमध्ये बॉलिवूडच्या हिमॅन अर्थात अभिनेता धर्मेंद्र (dharmendra) यांचा फोटो व्हायरल होत आहे. हा फोटो त्यांच्या स्ट्रगल काळातील आहे. विशेष म्हणजे सुरुवातीच्या काळात त्यांनी मोठा संघर्ष केला. या संघर्षानंतर स्वत:ला त्यांनी सिद्ध केलं. त्यामुळेच आज त्यांना अष्टपैलू अभिनेता म्हटलं जातं.

धर्मेंद्र यांनी कलाविश्वातून ब्रेक घेतला आहे. त्यामुळे ते फार क्विचत वेळा एखाद्या सिनेमात झळकतात. मात्र, सोशल मीडियावर ते कमालीचे सक्रीय आहे. सध्या ते त्यांचा जास्तीत जास्त वेळ शेतीकामात घालवतात. त्यामुळे शेतकाम करतानाचे अनेक फोटो, व्हिडीओ ते शेअर करत असतात. आता ते खऱ्या अर्थाने सुखवस्तू आयुष्य जगत आहेत. मात्र, त्यापूर्वी त्यांनी इतका संघर्ष केला की त्यांनी अनेक रात्री उपाशीपोटी जागून काढल्या आहेत.

बॉलिवूड अभिनेता दिलीप कुमार यांचे सिनेमा पाहून धर्मेंद्र यांनी कलाविश्वात पदार्पण केलं. सुरुवातीच्या काळात ते त्यांच्या एका मित्राच्या घरी रहायचे. एकदा ते एक ऑडिशन देऊन घरी आले होते. पोटात भूकेने प्रचंड कावळे ओरडत होते. पण, घरात अन्नाचा एक दाणा नव्हता. त्यामुळे घरात त्यांना इसबगोल दिसला तो पाण्यात विरघळवून त्यांनी खाल्ला. परंतु, त्यानंतर त्यांची प्रकृती प्रचंड खालवली. पोटात प्रचंड मुरडा येत होता. त्यामुळे वेदनेने विव्हळत असलेले धर्मेंद्र डॉक्टरांकडे गेले. त्यावेळी तुम्हाला औषधाची नाही तर जेवणाची गरज आहे, असं डॉक्टर त्यांना म्हणाले.

दरम्यान, अनेक खस्ता खाल्यानंतर त्यांनी कलाविश्वात हक्काचं स्थान निर्माण केलं. अलिकडेच ते रॉक और रानी की प्रेमकहानी या सिनेमात झळकले होते. त्यानंतर लवकरच ते ‘अपने 2’, ‘इक्किस’ आणि ‘अॅन इम्पॉसिबल लव्ह स्टोरी’ या सिनेमांमध्ये झळकणार असल्याचं म्हटलं जात आहे.
 

Web Title: guess-who-dharmendra-childhood-photos-actor-once-take-isabgol-powder-to-satisfy-hunger-during-struggling-days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.