‘अतिथी इन लंडन’च्या शूटिंगला लंडनमध्ये सुरूवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2017 04:07 AM2017-01-01T04:07:17+5:302017-01-01T04:07:17+5:30
अजय-कोंकणा आणि त्यांच्या एका लहान मुलाच्या आयुष्यात एक अनाहुत पाहुणा येतो तेव्हा काय धम्माल, मज्जा अनुभवायला मिळते ते आपण ‘अतिथी तुम कब जाओगे’मध्ये
अजय-कोंकणा आणि त्यांच्या एका लहान मुलाच्या आयुष्यात एक अनाहुत पाहुणा येतो तेव्हा काय धम्माल, मज्जा अनुभवायला मिळते ते आपण ‘अतिथी तुम कब जाओगे’मध्ये पाहिले. आता लवकरच या चित्रपटाचा सिक्वेल ‘अतिथी इन लंडन’ येणार आहे. चित्रपटाचे शूटिंग लंडनमध्ये नुकतेच सुरू झाले. ‘प्यार का पंचनामा’ फेम कार्तिक आर्यन याने शूटिंगच्या पहिल्या दिवसाचा फ ोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. ‘अतिथी इन लंडन’ या सिक्वेलच्या कथानकात थोडासा बदल करण्यात आला आहे. कार्तिक आर्यन, परेश रावळ, कृ ती खरबांदा आणि तन्वी आझमी हे सिक्वेलमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसतील. चित्रपटात कार्तिक हा त्याची आॅनस्क्रीन गर्लफ्रेन्ड अर्थात कृ ती खरबांदा हिच्यासोबत ‘लिव्ह-इन-रिलेशनशिप’ मध्ये राहत
असतो. यादरम्यान परेश रावल आणि त्याची पत्नी (तन्वी आझमी) अचानक पाहुणे म्हणून त्यांच्या घरी येतात. त्यानंतर जी काही धम्माल उडते, ते या चित्रपटात दिसणार आहे.
पुढील ५० दिवसांपर्यंत या चित्रपटाचे शूटींग चालणार असून २०१७
मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे सूत्रांकडून
कळतेय.