लहानग्यांचे भावविश्व उलगडणारा ‘हाफ तिकीट’

By Admin | Published: January 7, 2016 01:55 AM2016-01-07T01:55:07+5:302016-01-07T01:55:07+5:30

मराठी चित्रपटांमध्ये सध्या अनेक विषयांवरील चित्रपट तयार होताना पाहायला मिळत आहेत. सामाजिक, सस्पेन्स थ्रिलर, कॉमेडी अशा चित्रपटांबरोबरच किल्ला,

'Half Ticket' for kids | लहानग्यांचे भावविश्व उलगडणारा ‘हाफ तिकीट’

लहानग्यांचे भावविश्व उलगडणारा ‘हाफ तिकीट’

googlenewsNext

मराठी चित्रपटांमध्ये सध्या अनेक विषयांवरील चित्रपट तयार होताना पाहायला मिळत आहेत. सामाजिक, सस्पेन्स थ्रिलर, कॉमेडी अशा चित्रपटांबरोबरच किल्ला, एलिझाबेथ एकादशी, येलो असे लहान मुलांचे भावविश्व उलगडणारे चित्रपटही आवर्जून तयार केले जात आहेत. या नावांच्या यादीत आता अजून एका चित्रपटाची भर पडणार आहे. नानूभाई जयसिंघानी निर्मित व समीत कक्कड दिग्दर्शित ‘हाफ तिकीट’ हा एक वेगळा दृष्टिकोन देणारा चित्रपट लवकरच आपल्याला पाहायला मिळणार आहे.
वेगळे विषय हाताळणारे दिग्दर्शक समीत कक्कड यांनी यापूर्वी ‘आयना का बायना’ चित्रपटातून बालसुधारगृहातील लहान मुलाचं भावविश्व रेखाटलं होतं. या चित्रपटाने १८ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये देशाचं प्रतिनिधित्व करून आपली मोहर उमटवली होती. आता ‘हाफ तिकीट’च्या माध्यमातून पुन्हा एकदा नवीन काही तरी पाहायला मिळेल, याबद्दल शंकाच नाही. मुंबईच्या रिअल लोकेशन्सवर ‘हाफ तिकीट’च्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे.

Web Title: 'Half Ticket' for kids

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.