प्रेमाला वयाचं बंधन नाही.! वयाच्या 54 व्या वर्षी हंसल मेहता यांनी लिव इन पार्टनरसोबत बांधली लग्नगाठ
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2022 02:22 PM2022-05-25T14:22:24+5:302022-05-25T14:29:33+5:30
Filmmaker Hansal Mehta wedding : सफीना व हंसल दोघंही गेल्या 17 वर्षांपासून एकमेकांसोबत राहत होते. 17 वर्षांनंतर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला.
Filmmaker Hansal Mehta wedding : बॉलिवूडचे दिग्गज निर्माते व दिग्दर्शक हंसल मेहता ( Hansal Mehta ) सध्या एका वेगळ्याच कारणानं चर्चेत आहेत. होय, वयाच्या 54 व्या वर्षी हंसल यांनी पार्टनर सफीना हुसैनसोबत (Safeena Husain) लग्नगाठ बांधली. सोशल मीडियावर लग्नाची बातमी शेअर करत त्यांनी सर्वांना सुखद धक्का दिला.
सफीना व हंसल दोघंही गेल्या 17 वर्षांपासून एकमेकांसोबत राहत होते. 17 वर्षांनंतर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. अतिशय साध्या पद्धतीने दोघांनी लग्न केलं. हंसल यांनी लग्नाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे.
So after 17 years, two children, watching our two sons grow up and chasing our respective dreams we decided to get hitched. As always in life this marriage was also impromptu and unplanned. Ultimately love prevails over all else. And it has… pic.twitter.com/EQB1hjaicx
— Hansal Mehta (@mehtahansal) May 25, 2022
‘अखेर 17 वर्षानंतर, दोन मुलं झाल्यानंतर, आमच्या मुलांना मोठं होताना पाहताना, आमची स्वप्नं पूर्ण करत असताना आम्ही दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. आयुष्यातील अनेक गोष्टींप्रमाणेच हे सुद्धा उत्स्फूर्तपणे आणि पूर्वनियोजनाशिवाय घडलं. आमचं प्रेम खरं होतं. अखेर प्रेम सर्वांपेक्षा खूप महत्त्वाचं आहे आणि आमच्यात ते प्रेम आहे,’असं कॅप्शन त्यांनी दिलं आहे.
फोटोत हंसल कॅज्युअल टी-शर्ट, डेनिम आणि ब्लेजर अशा पोशाखात दिसत आहे तर सफीना यांनी गुलाबी रंगाचा कुर्ता सलवार परिधान केला आहे.
हंसल यांचं पहिलं लग्न सुनीता मेहतासोबत झालं होतं. दोघांना दोन मुलं झालीत. पुढे त्यांचा घटस्फोट झाला. वयाच्या एका टप्प्यावर सफीना यांच्या रूपात त्यांना नवी जोडीदार मिळाली. सफीना एक सोशल वर्कर आहेत. एज्युकेट गर्ल्स नामक एका स्वयंसेवी संस्थेच्या त्या संस्थापक आहेत. दिवंगत अभिनेते युसूफ हुसैन यांची त्या कन्या आहेत. गेल्यावर्षी युसूफ हुसैन यांचे कोरोनामुळे निधन झालं होतं. हंसल व सफीना किमाया आणि रिहाना या दोन मुलींचे पालक आहेत.
हंसल यांनी ‘खाना खजाना’ या टीव्ही शोद्वारे दिग्दर्शक म्हणून करिअरला सुरूवात केली होती. यानंतर त्यांनी अनेक मालिकांचं दिग्दर्शन केलं. 1999 साली ‘जयते’ हा पहिला सिनेमा त्यांनी दिग्दर्शित केला. यानंतर अनेक सिनेमांची निर्मितीही केली. 2013 साली त्यांनी दिग्दर्शित केलेला ‘शाहिद’ हा सिनेमाची चांगलीच चर्चा झाली होती. यात राजकुमार राव मुख्य भूमिकेत दिसला होता. या चित्रपटासाठी हंसल यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.