हंसिका मोटवानीने बेस्टफ्रेंडच्या पतीबरोबरच थाटला आहे संसार, अभिनेत्रीबद्दल ‘या’ गोष्टी माहीत आहेत?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2023 01:57 PM2023-08-09T13:57:41+5:302023-08-09T13:58:23+5:30
Hansika Motwani Birthday : MMS लीक ते बेस्टफ्रेंडच्या पतीबरोबर लग्न, ‘या’ गोष्टींमुळे हंसिका मोटवानी होती चर्चेत
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री हंसिका मोटवानीचा आज ३२वा वाढदिवस आहे. छोट्या पडद्यावरील ‘शाकालका बुम बुम’ या मालिकेतून ती घराघरात पोहोचली. बालकलाकार म्हणून अभिनयक्षेत्रात पाऊल ठेवलेल्या हंसिकाने ‘कोई मिल गया’ चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं होतं. त्यानंतर हंसिका अनेक चित्रपटांत झळकली. अभिनयातील करिअरप्रमाणेच ती वैयक्तिक आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत राहिली आहे.
२०१५ साली एका मुलीचा बाथरुममधील एमएमएस लीक झाला होता. व्हिडिओतील मुलगी हंसिका असल्याची चर्चा रंगली होती. तेव्हा हंसिका चर्चेत आली होती. त्यानंतर २०१८ साली हंसिकाच्या चित्रपटाच्या एका पोस्टरने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. हंसिकाच्या ‘महा’ चित्रपटाच्या पोस्टवर ती साध्वीच्या लूकमध्ये चिलम ओढताना दिसत होती. या पोस्टरमुळे वादही निर्माण झाला होता. हंसिकावर धार्मिक भावना भडकवल्याचा आरोप करत टीका करण्यात आली होती. हंसिकाचे बिकीनीतील काही वैयक्तिक फोटोही सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. हे फोटो तिच्या फोनमधून लीक झाल्याचं वृत्त होतं.
“इन्स्टा ब्लू टिक कितीला विकत घेतली?” विचारणाऱ्याला विशाखाचं उत्तर, म्हणाली, “गीतेवर हात ठेवून..."
“महाभारतावर चित्रपट बनला तर हनुमानाची भूमिका...”, ‘त्या’ वक्तव्यामुळे टायगर श्रॉफ ट्रोल
हंसिकाने डिसेंबर २०२२मध्ये बॉयफ्रेंड सोहेल कथुरियाबरोबर लग्नगाठ बांधत नवीन आयुष्याला सुरुवात केली. सोहेल हा तिच्या मैत्रिणीचा नवरा होता. हंसिकाने मैत्रिणीच्या नवऱ्याबरोबरच संसार थाटला. त्यामुळेही हंसिका चर्चेत आली होती. सोहेलबरोबर लग्न करण्याआधी हंसिका दाक्षिणात्य अभिनेता आणि निर्माता सिलम्बरासन देसिंगु राजेंद्रबरोबर रिलेशनशिपमध्ये होती. अनेक वर्ष डेट केल्यानंतर त्यांच्यातील नात्यात दुरावा आला.