सुपरस्टार चिरंजीवीचं खरं नाव माहितीये का? हनुमानाचा भक्त असल्यामुळे केला खऱ्या नावात बदल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2022 10:34 AM2022-08-22T10:34:30+5:302022-08-22T10:35:08+5:30
Chiranjeevi: दाक्षिणात्य कलाविश्वावर राज्य करणारा हा अभिनेता चिरंजीवी या नावाने ओळखला जातो. मात्र, प्रत्यक्षात त्यांचं खरं नाव दुसरंच आहे. सिनेसृष्टीत येण्यापूर्वी त्याने त्याच्या नावात बदल केला.
दाक्षिणात्य कलाविश्वातील नावाजलेला अभिनेता म्हणजे चिरंजीवी (chiranjeevi). उत्तम अभिनय आणि संवादफेक कौशल्य यामुळे चिरंजीवने साऊथसह बॉलिवूडच्या प्रेक्षकांवरही राज्य केलं आहे. स्वभावातील साधेपणामुळे या अभिनेत्याने कायमच प्रेक्षकांची मन जिंकली. त्यामुळेच आज त्याच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर त्याची चर्चा रंगली आहे. यामध्येच सध्या त्याच्या नावाची जोरदार चर्चा होताना दिसते.
दाक्षिणात्य कलाविश्वावर राज्य करणारा हा अभिनेता चिरंजीवी या नावाने ओळखला जातो. मात्र, प्रत्यक्षात त्यांचं खरं नाव दुसरंच आहे. सिनेसृष्टीत येण्यापूर्वी त्याने त्याच्या नावात बदल केला.
आंध्र प्रदेशमधील मोगलतूर या गावात बालपण गेलेल्या चिरंजीवीचे वडील पोलीस कॉन्स्टेबल होते. वडील कॉन्स्टेबल असल्यामुळे त्यांच्या सतत बदल्या होत राहायच्या. परिणामी, चिरंजीवी यांचं शिक्षण वेगवेगळ्या गावांमध्ये झालं. चिरंजीवी यांचं खरं नाव कोनिदेला शिवशंकर वर प्रसाद असं आहे. मात्र, त्यांनी हे नाव बदलून चिरंजीवी असं केलं.
चिरंजीवीच्या संपूर्ण कुटुंबाची हनुमानावर नितांत श्रद्धा आहे. त्यामुळे अभिनेत्याच्या आईने त्याचं खरं नाव बदलून चिरंजीवी हे नाव ठेवलं. चिरंजीवी म्हणजे कधीही अंत न होणारा. त्यामुळेच आपल्या मुलाने हे नाव लावावं असा सल्ला अभिनेत्याच्या आईने दिला. तेव्हापासून कोनिदेला शिवशंकर वर प्रसाद हा चिरंजीवी या नावाने ओळखला जाऊ लागला.
दरम्यान, प्रणम खरीदू या चित्रपटातून चिरंजीवने कलाविश्वात पदार्पण केलं. हा चित्रपट १९७८ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटानंतर चिरंजीवने एकाहून एक गाजलेले चित्रपट दिले. आजवरच्या कारकिर्दीत त्याने १५० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलं आहे.