धकधक गर्ल माधुरी दीक्षितला हा क्रिकेटर वाटायचा सर्वात सेक्सी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2018 12:47 PM2018-05-15T12:47:12+5:302018-05-15T12:48:22+5:30
80 आणि 90 च्या दशकात माधुरीने लोकांना वेड लावलं होतं. आजही तिच्या चाहत्यांमध्ये कमतरता नाहीये. हा तो काळ होता जेव्हा माधुरीचे फोटो लोक खिशात घेऊन फिरायचे.
मुंबई: लाखोंच्या हृदयांवर राज्य करणारी धक-धक गर्ल माधुरी दीक्षितचं नाव बॉलिवूडच्या त्या कलाकारांमध्ये घेतलं जातं ज्यांना पैसा आणि लोकप्रियता दोन्ही मिळाली. 80 आणि 90 च्या दशकात माधुरीने लोकांना वेड लावलं होतं. आजही तिच्या चाहत्यांमध्ये कमतरता नाहीये. हा तो काळ होता जेव्हा माधुरीचे फोटो लोक खिशात घेऊन फिरायचे.
माधुरीच्या भूमिका तर गाजल्याच त्यासोबतच तिचे लव्ह अफेअर्सही तितकेच गाजले. कधी संजय दत्तसोबत तर कधी अनिल कपूरसोबत तिचं नाव जोडलं गेलं. तेव्हा बॉलिवूडमध्ये एकापेक्षा देखणे अभिनेतेही होते. पण त्यांना सोडून माधुरीला एक क्रिकेटर अधिक आवडायचा वाटायचा. चला जाणून घेऊया कोण होता हा क्रिकेटर...
80 आणि 90 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी ही एका क्रिकेटरला पसंत करत होती. हा क्रिकेटर माधुरीला कोणत्याही बॉलिवूड अभिनेत्यापेक्षा जास्त सेक्सी वाटत होता. याचा जाहीर खुलासा तिने स्वत: केला होता.
इंडिया टुडेच्या एका मॅगझिनमध्ये प्रकाशित झालेल्या एका वॄत्ताचा हवाला देत माधुरीने सुनील गावस्करला सेक्सी म्हटले होते.
इंडिया टुडे मॅगझिनमध्ये प्रकाशित माहितीनुसार, ऑक्टोबर 1992 माधुरीने म्हटले होते की, ‘मला सुनील गावस्करच्या मागे धावायचंय होतं, तो खरंच सेक्सी आहेत’. माधुरीने जेव्हा हे वक्तव्य केले तेव्हा ती केवळ 25 वर्षांची होती आणि गावस्कर 43 वर्षांचे होते.