जेव्हा विवाहित मिथुन दा पडला होता श्रीदेवीच्या प्रेमात, पत्नीच्या धमकीने तुटलं होतं नातं

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2022 11:09 AM2022-06-16T11:09:32+5:302022-06-16T11:11:22+5:30

Happy Birthday Mithun Chakraborty : चर्चा होती की, दोघेही एकमेकांच्या प्रेमात होते. पण दोघांच्याही नात्याचा अंत दु:खद झाला. आज मिथुन दा यांचा वाढदिवस. चला जाणून घेऊ त्यांच्या या खास लव्हस्टोरीबाबत...

Happy Birthday Mithun Chakraborty : Mithun and sridevi tragic love story sad end | जेव्हा विवाहित मिथुन दा पडला होता श्रीदेवीच्या प्रेमात, पत्नीच्या धमकीने तुटलं होतं नातं

जेव्हा विवाहित मिथुन दा पडला होता श्रीदेवीच्या प्रेमात, पत्नीच्या धमकीने तुटलं होतं नातं

googlenewsNext

80 च्या दशकात मेनस्ट्रीम सिनेमात मिथुन चक्रवर्तीचा मोठा दबदबा होता. सिनेमातील भूमिकांसोबत पर्सनल लाइफपर्यंत सगळ्यांची चर्चा होत होती. आपल्या दमदार भूमिका आणि डान्ससाठी लोकप्रिय असलेला मिथुन त्यावेळी यशाच्या शिखरावर होता. त्यावेळी त्याचं नाव सुपरस्टार अभिनेत्री श्रीदेवीसोबत जुळलं (Mithun Chakraborty And Sridevi Love Story) होतं. चर्चा होती की, दोघेही एकमेकांच्या प्रेमात होते. पण दोघांच्याही नात्याचा अंत दु:खद झाला. आज मिथुन दा यांचा वाढदिवस. चला जाणून घेऊ त्यांच्या या खास लव्हस्टोरीबाबत...

मिथुन चक्रवर्ती यांनी 1979 मध्ये अभिनेत्री योगिता बालीसोबत लग्न केलं होतं. मिथुनसोबत योगिताचं हे दुसरं लग्न होतं. याआधी तिने गायक किशोर कुमार यांच्यासोबत लग्न केलं होतं. पण घटस्फोटानंतर तिने मिथुन दा सोबत लग्न केलं.

मिथुन दा आणि श्रीदेवी यांच्या लव्हस्टोरीबाबत सांगायचं तर दोघेही 'जाग उठा इन्सान' सिनेमाच्या दरम्यान एकमेकांच्या जवळ आले होते. पण त्यावेळी मिथुन दा विवाहित होते. तरीही श्रीदेवी आणि मिथुन दा यांच्या अफेअरची चर्चा जोरदार रंगली होती.

काही मीडिया रिपोर्ट्समध्ये तर असंही सांगण्यात आलं होतं की, श्रीदेवी आणि मिथुन यांनी लपून लग्नही केलं होतं. पण दोघांनी कधीही त्यांचं नातं जाहिरपणे स्वीकारलं नाही. मात्र, त्यांचं हे नातं जास्त काळ टिकू शकलं नाही. कारण मिथुन चक्रवर्ती यांची पत्नी योगिता बाली मिथुनला सोडायला तयार नव्हती. रिपोर्ट्सनुसार, मिथुन यांच्या लग्नाच्या बातम्या ऐकून योगिता बालीने आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला होता. याच कारणाने मिथुन यांनी श्रीदेवी सोबतचं नातं तोडलं होतं. 

वर्कफ्रंटबाबत सांगायचं तर मिथुन चक्रवर्ती यांनी 1976 मध्ये आलेल्या बंगाली मृग्या सिनेमापासून आपल्या करिअरला सुरूवात केली होती. आपल्या पहिल्याच सिनेमातील कामासाठी मिथुन दा यांना नॅशनल अवॉर्ड देण्यात आला होता. 80 चं दशक सुरू झालं आणि त्यांनी ओळख मिळाली. तेच श्रीदेवी तेव्हा सुपरस्टार बनली होती. 

Web Title: Happy Birthday Mithun Chakraborty : Mithun and sridevi tragic love story sad end

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.