श्रीदेवींच्या आठवणीत बोनी कपूर झाले भावूक, शेअर केला unseen फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2024 11:15 AM2024-08-13T11:15:10+5:302024-08-13T11:16:32+5:30

बोनी कपूर यांनी एक भावनिक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. 

happy birthday my jaan boney kapoor shared unseen picture on sridevi birth anniversary | श्रीदेवींच्या आठवणीत बोनी कपूर झाले भावूक, शेअर केला unseen फोटो

श्रीदेवींच्या आठवणीत बोनी कपूर झाले भावूक, शेअर केला unseen फोटो

Sridevi Birth Anniversary  : बॉलिवूडची 'चाँदनी' अशी ओळख असणाऱ्या अभिनेत्री श्रीदेवी (Sridevi) यांची आज ६१ बर्थ ॲनिव्हर्सरी आहे. आजपासून बरोबर ६१ वर्षांपूर्वी म्हणजेच १३ ऑगस्ट १९६३ ला श्रीदेवी यांचा जन्म तामिळनाडूमध्ये झाला होता. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त बोनी कपूर (Boney Kapoor) भावूक झाले. त्यांनी एक भावनिक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. 

बोनी कपूर यांनी आपल्या लाडक्या पत्नीचा एक सुंदर फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहलं, 'हॅपी बर्थडे माय जान'. बोनी कपूर यांच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले. बोनी कपूरच्या या पोस्टवर अनेकांच्या कमेंट्स  केल्या आहेत. चाहतेदेखील श्रीदेवीच्या आठवणीत भावूक झाल्याचं दिसून येत आहे. तर श्रीदेवी यांची धाकटी लेक खुशी कपूरने आपल्या आईसोबतचा लहानपणीचा फोटोही इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. अत्यंत गोड असा हा फोटो आहे. 


भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिली लेडी सुपरस्टार म्हटल्या जाणार्‍या श्रीदेवी यांचं २४ फेब्रुवारी २०१८ रोजी अचानक निधन झालं होतं.  ही घटना सर्वांच्याच मनाला चटका लावणारी होती. दुबईच्या एका हॉटेलमध्ये बाथटबमध्ये बुडून श्रीदेवी यांचा मृत्यू झाला होता. श्रीदेवी यांचं अचानक जाणं त्यांच्या कुटुंबियांसाठी मोठा धक्का होता. आजही त्यांचे पती बोनी कपूर, लेकी जान्हवी आणि खूशी श्रीदेवींच्या आठवणीत जगत आहेत.  श्रीदेवी आज जरी या जगात नसल्या तरी त्या चाहत्यांच्या हृदयात नेहमीच जिवंत आहेत.

Web Title: happy birthday my jaan boney kapoor shared unseen picture on sridevi birth anniversary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.