Happy Independence Day 2019 : देशभक्तीची भावना जागृत करणारी बॉलिवूडची गाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2019 09:24 AM2019-08-15T09:24:20+5:302019-08-15T09:25:17+5:30
स्वातंत्र्य दिनादिवशी देश भक्तीपर गीते आपल्याला नेहमी ऐकायला मिळतात. बॉलिवूड चित्रपटातील अनेक देश भक्तीपर गीते प्रचंड प्रसिद्ध आहेत.
स्वातंत्र्य दिनादिवशी देश भक्तीपर गीते आपल्याला नेहमी ऐकायला मिळतात. बॉलिवूड चित्रपटातील अनेक देश भक्तीपर गीते प्रचंड प्रसिद्ध आहेत... जाणून घेऊया कोणती देशभक्तीपर गीते सगळ्यांच्या ओठावर रुळली आहेत.
ए मेरे वतन के लोगो
लता मंगेशकर यांनी युद्धानंतर गायलेले ए मेरे वतन के लोगो हे गाणे ऐकताना त्या वेळेचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांना देखील आपले अश्रू आवरता आले नव्हते लता मंगेशकर यांच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट गाण्यांपैकी हे एक गाणे आहे.
आय लव्ह माय इंडिया
परदेस या चित्रपटातील कविता कृष्णमूर्तीने गायलेले आय लव्ह इंडिया हे गाणे आणि या गाण्याचे बोल मनाला नक्कीच स्पर्शून जातात.
अब तुम्हारे हवाले वतन साथीयो
हकीगत या चित्रपटातील अब तुम्हारे हवाले वतन साथीयो हे गाणे देशभक्तीपर गीतांमधील अनेकजणांचे सगळ्यात आवडते गाणे आहे.
चक दे इंडिया
चक दे इंडिया या चित्रपटातील चक दे इंडिया हे गाणे ऐकताच एक वेगळा प्रकारचा जोश निर्माण होतो.
ये वतन
ये वतन हे गाणं राझी चित्रपटातील असून आलिया भटवर चित्रीत करण्यात आलं आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन मेघना गुलजारनं केलं असून यात विकी कौशल मुख्य भूमिकेत होता.
तेरी मिट्टी
अक्षय कुमारचा चित्रपट केसरीमधील तेरी मिट्टी हे गाणं असून या गाण्याला प्रेक्षकांचा खूप चांगली दाद मिळाली आहे.