Video: नृत्यकौशल्यातून अंतराने व्यक्त केलं देशप्रेम; सोशल मीडियावर होतंय अभिनेत्रीचं कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2022 02:18 PM2022-08-14T14:18:43+5:302022-08-14T14:19:22+5:30

Har ghar tiranga: अंतरा अभिनेत्री असण्यासोबतच एक उत्तम नृत्यांगनादेखील आहे. बऱ्याचदा ती इन्स्टाग्रामवर तिच्या नृत्याचे व्हिडीओ शेअर करत असते.

har ghar tiranga campaign marathi actress yogita chavan dance video viral | Video: नृत्यकौशल्यातून अंतराने व्यक्त केलं देशप्रेम; सोशल मीडियावर होतंय अभिनेत्रीचं कौतुक

Video: नृत्यकौशल्यातून अंतराने व्यक्त केलं देशप्रेम; सोशल मीडियावर होतंय अभिनेत्रीचं कौतुक

googlenewsNext

१५ ऑगस्ट २०२२ रोजी भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी ७५ वा स्वातंत्र्य दिन आहे. त्यामुळे स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभरात उत्साहाचं वातावरण आहे. सरकारनेही स्वातंत्र्याची ७५ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल देशात अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. या महोत्सवानिमित्त सरकारनं हर घर तिरंगा अभियान(Har Ghar Tiranga) हाती घेतले आहे. या मोहिमेअंतर्गत १३ ते १५ ऑगस्ट या काळात प्रत्येक घरावर तिरंगा फडकणार आहे. विशेष म्हणजे या मोहिमेत सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येकाने सहभाग घेतला आहे. अलिकडेच अभिनेत्री योगिता चव्हाण हिने देशभक्ती गीतावर सुंदर नृत्य सादर केलं आहे.

'जीव माझा गुंतला' या मालिकेच्या माध्यमातून योगिता घराघरात पोहोचली आहे. या मालिकेत अंतरा ही भूमिका साकारणारी योगिता सोशल मीडियावर सक्रीय असून कायम तिच्याविषयीचे अपडेट्स चाहत्यांसोबत शेअर करत असते. अलिकडेच तिने अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त तिच्या नृत्यातून देशाप्रतीचं प्रेम व्यक्त केलं आहे.

"देस मेरा रंगीला... या देशभक्ती गाण्यावर नृत्य करून, अंतराने साजरा केला अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाचा आनंद!", असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे.

दरम्यान, अंतरा अभिनेत्री असण्यासोबतच एक उत्तम नृत्यांगनादेखील आहे. बऱ्याचदा ती इन्स्टाग्रामवर तिच्या नृत्याचे व्हिडीओ शेअर करत असते. तसंच मालिकेतील तिचा सहकलाकार मल्हारसोबतचे मजेशीर रिल्सदेखील ती शेअर करते.
 

Web Title: har ghar tiranga campaign marathi actress yogita chavan dance video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.