बिपाशा बासू येणार म्हटल्यावर हरमन बावेजाने अचानक बदलला आपला प्लान!!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2018 10:14 PM2018-07-31T22:14:53+5:302018-07-31T22:20:49+5:30

बॉलिवूडचे जगचं विचित्र आहे. येथे कधी नातं जुळेल आणि कधी तुटेल, हे सांगता येत नाही. या वळणावर अनेकांच्या समोर त्यांचा भूतकाळ येऊन उभा राहतो आणि अनेक गोष्टी बिघडायला लागतात.

harman baweja skipped a crazy goa party because of bipasha basu | बिपाशा बासू येणार म्हटल्यावर हरमन बावेजाने अचानक बदलला आपला प्लान!!

बिपाशा बासू येणार म्हटल्यावर हरमन बावेजाने अचानक बदलला आपला प्लान!!

googlenewsNext

बॉलिवूडचे जगचं विचित्र आहे. येथे कधी नातं जुळेल आणि कधी तुटेल, हे सांगता येत नाही. या वळणावर अनेकांच्या समोर त्यांचा भूतकाळ येऊन उभा राहतो आणि अनेक गोष्टी बिघडायला लागतात. काही जण भूतकाळ विसरून पुढे जातात. काहींची मात्र या भूतकाळाशी सामना करताना भंबेरी उडते. अभिनेता हरमन बावेजा याच्याबद्दलही नेमके हेच म्हणता येईल. त्याचे झाले असे की, ‘बँग बँग’चा दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदने आपल्या पत्नीच्या वाढदिवसाला एक जंगी पार्टी ठेवली. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींना गोव्यात होऊ घतलेल्या या पार्टीचे निमंत्रण दिले गेले. यात बिपाशा बासू, तिचा पती करण सिंग ग्रोव्हर,शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा, किरण बावा, सुजॉय घोष अशा अनेकांचा समावेश आहे.

बिपाशा व करण या पार्टीत येणार का, हे आधी कन्फर्म नव्हते. पण नंतर बिपाशाने स्वत: सिद्धार्थला फोन करून या पार्टीला येणार असल्याचे सांगितले. मग काय, बिपाशा येणार म्हटल्यावर हरमन बावेजाने अचानक आपला प्लान बदलला. मी येऊ शकणार नाही, हे त्याने सिद्धार्थला कळवून टाकले. याचे कारण स्पष्ट होते, हरमनला एक्स गर्लफ्रेन्ड बिपाशा समोर आलेली नको होती. बिपाशा चुकूनही समोर यायला नको, हा त्याचा प्रयत्न होता. खरे तर गतवर्षी दोनदा हरमन व बिपाशाचा एकमेकांसोबत सामना झाला होता.  पहिल्या भेटीत त्याने बिपाशाकडे साफ दुर्लक्ष केले. दुसऱ्यांदा बिपाशा पुन्हाहरमनच्या समोर आली. तिला टाळणे अशक्य झाल्यावर हरमन बिपाशाशी बोलला होता. केवळ इतकेच नाही तर तिला त्याने शुभेच्छाही दिल्या होत्या. पण आता कदाचित हरमनला भूतकाळाशी सामना नकोय.

हरमन व प्रियांका चोप्रा यांच्या रिलेशनशिपच्या बातम्या एकेकाळी प्रचंड गाजल्या होत्या. दोघेही पाच वर्षे एकमेकांना डेट करत होते. ‘लव्ह स्टोरी२०५०’च्या सेटवरच दोघांमध्ये प्रेम फुलले होते. पण कालांतराने दोघांचेही ब्रेकअप झाले. यानंतर हरमन व बिपाशा यांच्या डेटींगच्या बातम्या आल्यात.२०१४ मध्ये आपण बिपाशासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचे हरमनने म्हटले होते. मात्र त्यावर्षी डिसेंबरमध्ये बिपाशाने हरमनसोबत ब्रेकअप झाल्याचे जाहिर केले. ‘विक्ट्री’,‘व्हाट्स योर राशी’,‘ढिश्कियाऊं’ असे चित्रपट हरमनच्या नावावर आहेत. पण हे सगळेच चित्रपट बॉक्सआॅफिसवर आपटलेत अन् हरमनच्या करिअरला उतरती कळा लागली.

 

Web Title: harman baweja skipped a crazy goa party because of bipasha basu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.