Harman Baweja: हरमन बावेजा झाला बाबा, लग्नाच्या वर्षभरानंतर पत्नी साशाने दिला मुलाला जन्म
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2022 10:23 AM2022-12-23T10:23:39+5:302022-12-23T10:36:19+5:30
Harman Baweja : कधीकाळी लाखों तरूणींच्या ‘दिलाची धडकन’ असलेला अभिनेता हरमन बावेजाने गतवर्षी ‘साशा रामचंदानी हिच्यासोबत लग्नगाठ बांधली होती. आता हरमन व साशा आई-बाबा झाले आहेत.
Harman Baweja : कधीकाळी लाखों तरूणींच्या ‘दिलाची धडकन’ असलेला अभिनेता हरमन बावेजाने गतवर्षी ‘साशा रामचंदानी हिच्यासोबत लग्नगाठ बांधली होती. आता हरमन व साशा आई-बाबा झाले आहेत. होय, साशाने काल एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. अद्याप हरमन व साशाने याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही. पण मीडिया रिपोर्ट्समध्ये हरमन बाबा झाल्याचा दावा केला जात आहे.
बॉलिवूड हंगामाने दिलेल्या वृत्तानुसार, 22 डिसेंबरला हरमन व साशा यांनी मुलाचा जन्म झाला. पहिल्या अपत्याच्या जन्माने या जोडप्याच्या घरी सध्या आनंदाचं वातावरण आहे. हरमनची पत्नी साशा न्युट्रिशनिस्ट व डायटीशियन आहे. 21 मार्च 2021 रोजी दोघांनी लग्न केलं.
‘लव्ह स्टोरी 2050’ मधून बॉलिवूड डेब्यू करणारा हरमन त्याच्या अॅक्टिंगपेक्षा हृतिक रोशनचा डुप्लिकेट म्हणूनच अधिक लोकप्रीय झाला होता. त्याचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फार कमाल दाखवू शकला नाही. पण लुक्स आणि हॉट बॉडी यामुळे हरमनची त्यावेळी बरीच क्रेझ होती. अर्थात हळूहळू ही क्रेझ ओसरली आणि हरमन बॉलिवूडमधून बाहेर फेकल्या गेला.
एकेकाळी हरमन व प्रियंका चोप्रा यांच्या रिलेशनशिपच्या बातम्या प्रचंड गाजल्या होत्या. दोघेही पाच वर्षे एकमेकांना डेट करत होते. ‘लव्ह स्टोरी 2050’च्या सेटवरच दोघांमध्ये प्रेम फुलले होते. पण कालांतराने दोघांचेही ब्रेकअप झाले. यानंतर हरमन व बिपाशा यांच्या डेटींगच्या बातम्याही आल्यात.
2014 मध्ये आपण बिपाशासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचे हरमनने म्हटले होते. मात्र त्यावर्षी डिसेंबरमध्ये बिपाशाने हरमनसोबत ब्रेकअप झाल्याचे जाहिर केले. विक्ट्री, व्हाट्स योर राशी, ढिश्कियाऊ असे चित्रपट हरमनच्या नावावर आहेत. पण हे सगळेच चित्रपट आपटलेत अन हरमनच्या करिअरला उतरती कळा लागली.