'बजरंगी भाईजान'च्या मुन्नीने केलं आलमजेबला कॉपी; 'एक बार देख लिजिए'वर दिले जबरदस्त एक्स्प्रेशन्स

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2024 01:41 PM2024-05-13T13:41:39+5:302024-05-13T13:59:07+5:30

Harshaali malhotra: हिरामंडीमध्ये Ek Baar Dekh Lijiye  हे गाणं सध्या सोशल मीडियावर ट्रेंड होतंय. हे गाणं आजमजेबवर चित्रीत करण्यात आलं आहे.

harshaali-malhotra-dance-video-on-heeramandi-the-diamond-bazar-song-goes-viral | 'बजरंगी भाईजान'च्या मुन्नीने केलं आलमजेबला कॉपी; 'एक बार देख लिजिए'वर दिले जबरदस्त एक्स्प्रेशन्स

'बजरंगी भाईजान'च्या मुन्नीने केलं आलमजेबला कॉपी; 'एक बार देख लिजिए'वर दिले जबरदस्त एक्स्प्रेशन्स

संजय लीला भन्साळी यांची 'हिरामंडी : द डायमंड बाजार' (Heeramandi: The Diamond Bazaar) ही वेबसीरिज सध्या चांगलीच गाजत आहे. मल्टीस्टारर असलेल्या या वेबसीरिजमध्ये बॉलिवूडच्या अनेक दिग्गज अभिनेत्री झळकल्या आहेत. यामध्येच संजय लीला भन्साळी यांची भाची शर्मिन (Sharmin Segal) हिने देखील महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. विशेष म्हणजे तिची भूमिका सध्या सोशल मीडियावर चर्चिली जात आहे. इतकंच नाही तर तिच्या भूमिकेची भुरळ सामान्यांपासून सेलिब्रिटींनाही पडली आहे.

हिरामंडीमध्ये Ek Baar Dekh Lijiye  हे गाणं सध्या सोशल मीडियावर ट्रेंड होतंय. हे गाणं आजमजेबवर चित्रीत करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे हे गाणं पाहता पाहता प्रचंड लोकप्रिय झालं. त्यामुळे त्याच्यावर अनेकांनी रिल्स देखील केले आहेत. यामध्येच 'बजरंगी भाईजान' या सिनेमातील मुन्नी म्हणजेच हर्षाली मल्होत्रा (harshaali malhotra) हिने सुद्धा या गाण्यावर एक व्हिडीओ शेअर केला. विशेष म्हणजे तिने हुबेहूब आलमजेब प्रमाणे गेटअप केला असून यात ती कमालीची सुंदर दिसत आहे.

दरम्यान, हर्षालीने केवळ आलमजेबप्रमाणे गेटअपच केला नाही. तर तिच्याप्रमाणेच सुंदर एक्स्प्रेशन्सदेखील दिले आहेत. त्यामुळे तिच्या या व्हिडीओला पसंती मिळत आहे. हर्षाली सोशल मीडियावर कमालीची सक्रीय असून ती कायम नवनवीन पोस्ट शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा पर्यत्न करत असते.

Web Title: harshaali-malhotra-dance-video-on-heeramandi-the-diamond-bazar-song-goes-viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.