माझ्या नवर्‍याची बायकोः सैफच्या पहिल्या पत्नीला कधी भेटलीय Kareena Kapoor? स्वतःच केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2021 02:39 PM2021-12-11T14:39:48+5:302021-12-11T14:46:30+5:30

सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि अमृता सिंग(Amrita Singh ) चे लग्न 13 वर्षांनंतर तुटले. अमृता सिंग आणि सैफ अली खान यांचे लग्न 1991 मध्ये झाले होते. या लग्नातून त्यांना दोन मुलेही झाली,सारा अली खान (Sara Ali khan) आणि इब्राहिम अली खान(Ibrahim Ali Khan) दोघेही चांगलेच फेमस आहेत.

Has ever Amrita Singh, Saif Ali Khan's First wife met Kareena Kapoor, actress reveals, check details | माझ्या नवर्‍याची बायकोः सैफच्या पहिल्या पत्नीला कधी भेटलीय Kareena Kapoor? स्वतःच केला खुलासा

माझ्या नवर्‍याची बायकोः सैफच्या पहिल्या पत्नीला कधी भेटलीय Kareena Kapoor? स्वतःच केला खुलासा

googlenewsNext

बॉलीवुडचा छोटे नवाब सैफ अली खान(Saif Ali Khan) याची दोन लग्न झाली आहेत. पहिले लग्न अभिनेत्री अमृता सिंह (Amrita Singh ) हिच्याशी झालं होतं. त्या लग्नावेळी सैफची दुसरी पत्नी करीना (Kareena Kapoor) ही चिमुकली शाळकरी मुलगी होती.ती सैफच्या लग्नात त्या शुभेच्छा देण्यासाठी आली होती. त्यावेळी सैफला अंकल अंकल संबोधणारी हिच चिमुकली त्याच्याशी दुसरे लग्न करुन त्याची बेगम बनेल याची कल्पना त्यावेळी कुणीही केली नसेल. 

करीना कपूर हिचे आधीअभिनेता शाहिद कपूर(Shahid Kapoor)  वर प्रेम होते. दोघंही लग्न करणार अशा चर्चाही रंगल्या होत्या. मात्र कुठेतरी दोघांमध्ये बिनसले आणि ते वेगळे झाले. त्याचवेळी करीनाच्या आयुष्यात सैफची एंट्री झाली आणि दोघे प्रेमात पडले. दोघांच्या आगळ्यावेगळ्या लव्ह स्टोरीची बॉलीवुडमध्ये चर्चा सुरु झाली. बराच काळ एकत्र घालवल्यानंतर त्यांनी लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. शाहिदशी ब्रेकअप झाल्यानंतर टशन सिनेमाच्या सेटवर सैफ करीना भेटले आणि दोघांतली जवळीक वाढू लागली. टशन सिनेमात सैफ,करीनासह अक्षयकुमारसुद्धा होता. त्यावेळी सैफचा स्वभाव बेबोला भावला. महिलांप्रती सैफच्या मनातील आदर पाहून ती त्याच्यावर लट्टू झाली.वयाने सैफ करीनापेक्षा १० वर्षांनी मोठा आहे.


सैफ अली खान आणि अमृता सिंगचे लग्न 13 वर्षांनंतर तुटले. अमृता सिंग आणि सैफ अली खान यांचे लग्न 1991 मध्ये झाले होते. या लग्नातून त्यांना दोन मुलेही झाली, सारा अली खान (Sara Ali khan) आणि इब्राहिम अली खान (Ibrahim Ali Khan) आज खूपच फेमस आहेत.कॉफी विथ करण,शोमध्ये करीना कपूर खान आणि प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) दोघींनी हजेरी लावली होती.  

यादरम्यान शोचा होस्ट करण जोहर (Karan Johar) ने करीना कपूर खानला सैफची पहिली पत्नी अमृताबद्दल काही प्रश्न विचारले होते. खरंतर करणने करीनाला विचारलं होतं की अमृता सिगला तु कधी भेटली आहेस का ? या प्रश्नाचs उत्तर करिनाने 'नाही' म्हणून दिले होते. ''मी कधीही अमृताला भेटले नाही. पण मी अमृताचा खूप आदर करते.सैफ आणि अमृताचा 2004 साली घटस्फोट झाला, त्यानंतर सैफ बराच काळ सिंगल होता.'' 'टशन' सिनेमाच्या शूटिंगनंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतल्याचे तिने सांगितले होते.
 

Web Title: Has ever Amrita Singh, Saif Ali Khan's First wife met Kareena Kapoor, actress reveals, check details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.