"ह्याला प्रत्येक ठिकाणी घुसण्याची सवय आहे", रणवीर सिंगबद्दल असं का म्हणाला सलमान खान?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2024 12:03 PM2024-11-12T12:03:08+5:302024-11-12T12:04:15+5:30

सलमान खान (Salman Khan) आणि रणवीर सिंग (Ranveer Singh) हे दोघेही बॉलिवूडचे सुपरस्टार आहेत. दोघांचाही वेगळा चाहतावर्ग आहे.

"He has a habit of entering everywhere", why did Salman Khan say this about Ranveer Singh? | "ह्याला प्रत्येक ठिकाणी घुसण्याची सवय आहे", रणवीर सिंगबद्दल असं का म्हणाला सलमान खान?

"ह्याला प्रत्येक ठिकाणी घुसण्याची सवय आहे", रणवीर सिंगबद्दल असं का म्हणाला सलमान खान?

सलमान खान (Salman Khan) आणि रणवीर सिंग (Ranveer Singh) हे दोघेही बॉलिवूडचे सुपरस्टार आहेत. दोघांचाही वेगळा चाहतावर्ग आहे. पण आज आम्ही तुम्हाला त्यांच्याशी संबंधित गोष्ट सांगणार आहोत. हे जाणून तुम्ही थक्क व्हाल. खरेतर एकदा रणवीर सिंगसलमान खानचा शो 'बिग बॉस'(Bigg Boss)मध्ये पोहोचला होता. जिथे भाईजानने त्याला असा टोमणा मारला होता. जो बराच काळ चर्चेत होता.

ही घटना सलमान खानच्या सर्वात वादग्रस्त रिॲलिटी शो 'बिग बॉस १५' मधील आहे. जिथे रणवीर सिंगने जबरदस्त स्वॅगसह एन्ट्री घेतली. यादरम्यान रणवीर शांतपणे स्टेजवर आला आणि सलमान खानच्या मागे खुर्चीवर बसला. तेव्हा सलमान खानची नजर त्याच्यावर पडली. त्यामुळे तो चकीत झाला. यानंतर, सलमानने अभिनेत्याची खिल्ली उडवली आणि म्हणला की त्याला सर्वत्र घुसण्याची सवय का आहे हे माहित नाही. असे असतानाही सलमानने रणवीरला खूप मजेशीर पद्धतीने हे सांगितले होते. पण त्याची सोशल मीडियावर बराच वेळ चर्चा झाली होती.

रणवीर सिंगची अशी होती प्रतिक्रिया

सलमानचे हे बोलणे ऐकून रणवीर स्टेजवर जोरजोरात हसताना दिसला. तो त्याचा मोठा चाहता असल्याचेही त्याने अभिनेत्याला सांगितले. रणवीरने सांगितले होते की, जेव्हा सलमानचा 'सुलतान' चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा तो पॅरिसमध्ये होता आणि त्याने तो चित्रपट तिथे पाहिला होता. रणवीरला हा चित्रपट इतका आवडला की तो हॉलमध्येच नाचू लागला. यानंतर सलमान खानही दीपिका पादुकोणचा पती रणवीर सिंगची खूप प्रशंसा करताना दिसला. भाईजान म्हणाला होता की, आता तू रणवीर सिंग आहेस आणि हे नेहमी लक्षात ठेव. 

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, दोन्ही स्टार्स नुकतेच रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन' चित्रपटात कॅमिओ करताना दिसले.

Web Title: "He has a habit of entering everywhere", why did Salman Khan say this about Ranveer Singh?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.