हृदयी वसंत फुलताना...!

By Admin | Published: April 1, 2016 02:21 AM2016-04-01T02:21:23+5:302016-04-01T02:21:23+5:30

हृतिक-सुझान, फरहान-अधुना, अनुष्का-विराट, अरबाज-मलायका... या मंडळींच्या एकामागून एक येणाऱ्या ब्रेकअपच्या बातम्यांनी मागच्या काही दिवसांत बॉलीवूड पुरते हादरले.

The heart is blooming ...! | हृदयी वसंत फुलताना...!

हृदयी वसंत फुलताना...!

googlenewsNext

हृतिक-सुझान, फरहान-अधुना, अनुष्का-विराट, अरबाज-मलायका... या मंडळींच्या एकामागून एक येणाऱ्या ब्रेकअपच्या बातम्यांनी मागच्या काही दिवसांत बॉलीवूड पुरते हादरले. नात्यातील सुंदरतेला भावनांच्या नव्हे, व्यवहाराच्या कसोटीवर पडताळणारे हे सेलीब्रिटी किती पाषाणहृदयी असतात, अशी टीका बॉलीवूड बाहेरूनही सुरू झाली. परंतु ऋतुराज वसंताच्या आगमनासोबतच बॉलीवूडचा मोसमही बदलायला लागला आहे. चैत्राच्या पालवीसारखीच प्रेमभावनांनाही नवी पालवी फुटत आहे. ब्रेकअपच्या बातम्यांनी कितीही नकारात्मकता पसरवली असली, तरी प्रेम सत्य अन् शाश्वत आहे. त्याची निरंतरता कधीही संपणारी नाही, हाच संदेश नव्याने घडणाऱ्या या प्रेमकथा देत आहेत. त्यावर एक नजर...

बिपाशा-करण
बिपाशा बसू व करणसिंह ग्रोवर दोघेही त्यांच्या रिलेशनबाबत आॅफिशिअली कबुली देण्याच्या मूडमध्ये आहेत. बिप्स आणि करणचे रिलेशन त्यांच्या कुटुंबीयांना मान्य नसल्याची बातमी यापूर्वी आली होती. मात्र ताज्या बातमीनुसार, बिप्सची आई अखेर मानली असून तिने करण व बिपाशाच्या नात्याला होकार दिला आहे. या होकारानंतरही करणच्या आईकडून होकार येणे बाकी होते. पण करणच्या मॉमनेही या नात्याला हिरवी झेंडी दिल्याचे कळते.

मलायका-डिनो मोरिया
मलायका अरोरा आणि अरबाज खान म्हणजे बी-टाऊनमधील ग्लॅम कपल. पण हे कपलही वेगळे झाले. निश्चितपणे मलायकासाठी हा टफ टाइम आहे. हे दु:ख मलायका कितीही दाखवत नसली तरी अद्यापही पचवू शकलेली नाही... पण शेवटी हे दु:ख शेअर करायला कुणी तरी जिवाभावाची व्यक्ती हवीच. मलायकाला ही व्यक्ती मिळालीय... ती म्हणजे डिनो मोरिया. एका बातमीनुसार, मलायका व डिनो दोघेही अनेक तास चॅटिंग करताना दिसले. कदाचित या चॅटिंगमधून मलायका मनीचे दु:ख शेअर करत असावी.

एक प्रेम असेही...
बॉलीवूड अभिनेत्री अमायरा दस्तूर सध्या जयपूरमध्ये आहे. येथे ती आपल्या पहिल्यावहिल्या ‘कुंग फू योगा’ या आंतरराष्ट्रीय चित्रपटाच्या शूटिंंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात जॅकी चॅन व सोनू सूद यांच्या मुख्य भूमिका आहेत. आता तुम्ही म्हणाल, आम्ही काय हे चित्रपटाबद्दल काय सांगत बसलोय... खरे तर अमायरा कुणाच्या प्रेमात पडली हे ऐकण्यात तुम्हाला रस आहे. तेव्हा आम्ही अधिक ताणून धरत नाही. अमायरा प्रेमात पडलीय, हे खरं आहे. ही व्यक्ती नसून प्राणी आहे. होय, चित्रपटात काम करणाऱ्या एका हत्तीवर अमायराचा जीव जडला आहे. या हत्तीला ती सतत जपते, त्याची काळजी घेते.

सुशांतसिंह-अंकिता
सुशांतसिंह राजपूत आणि अंकिता लोखंडे या ‘लव्हबर्ड’च्या ब्रेक-अपच्या बातमीने दोघांच्याही चाहत्यांना धक्का बसला. पण अंकिताने ही बातमी नाकारली आहे. ब्रेक-अपच्या बातमीनंतर प्रथमच अंकिताने आपले मौन सोडत या विषयावर खुलासा केला आहे.

पूजा भट्ट-आसिफ आझीम
अभिनेत्री, मॉडेल, निर्माती-दिग्दर्शिका पूजा भट्ट प्रेमात पडल्याची खबर आहे. ‘बिग बॉस’चा माजी स्पर्धक आसिफ आझीम याच्यासोबत पूजा डेट करीत आहे. मूळचा बांगलादेशचा असलेला आसिफ एक लोकप्रीय मॉडेल आहे.

Web Title: The heart is blooming ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.