अभिजीत-निक्कीमध्ये वाद अन् इतरांना हसू अनावर! DP वैतागून म्हणाला- 'अरे थांबा २२ कॅमेरे...'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2024 04:20 PM2024-09-05T16:20:28+5:302024-09-05T16:22:09+5:30

अंकिता-निक्कीमध्ये झालेल्या भांडणाची घरातील इतर स्पर्धकांनी चांगलीच मजा लुटलेली दिसली (bigg boss marathi 5)

heated argument between DP dhananjay powar with Abhijeet sawant and Nikki tamboli in bigg boss marathi 5 | अभिजीत-निक्कीमध्ये वाद अन् इतरांना हसू अनावर! DP वैतागून म्हणाला- 'अरे थांबा २२ कॅमेरे...'

अभिजीत-निक्कीमध्ये वाद अन् इतरांना हसू अनावर! DP वैतागून म्हणाला- 'अरे थांबा २२ कॅमेरे...'

बिग बॉस मराठीच्या घरात भांडण, वादविवाद, शाब्दिक चकमक होणं नवीन नाही. बिग बॉस मराठीचा नवीन सीझन सुरु होऊन सहावा आठवडा सुरु झालाय. सहाव्या आठवड्यात सदस्यांमध्ये भांडणाने टोक गाठलंय. यामुळे घरातील सदस्यांना चांगलाच वैताग आणलाय. याचाच अनुभव नुकताच  आला. जेव्हा अभिजीत-निक्कीमध्ये भांडण सुरु झालं. दोघांपैकी कोणीच थांबत नव्हतं तेव्हा DP दादा आणि अंकिताने पुढाकार घेऊन दोघांचं भांडणं थांबवायचा प्रयत्न केला.

अभिजीत-निक्कीमध्ये भांडण वाढलं तेव्हा...

बिग बॉस मराठीचा नवीन प्रोमो रिलीज झालाय. या प्रोमोत आजच्या कॅप्टनसी टास्कची झलक पाहायला मिळतेय. इतर सदस्य खाली खुर्चीवर बसलेले असतात. अभिजीत-निक्की उभे असतात. दोघांमध्ये टोकाचं भांडणं झालं. खाली बसलेले सदस्य मात्र मजा घेत होते. शेवटी DP अभिजीत-निक्कीला वैतागून म्हणाला, "अरे थांबा आता. सगळे २२ कॅमेरे तुमच्या दोघांवर जातील थांबा आता." असं DP वैतागून म्हणताना दिसतो.


कॅप्टनसी कार्य चालू असल्याने अंकिता DP दादाला म्हणते, "हे म्हणजे असं झालं दोघात तिसरा आता कॅप्टनसी विसरा." अशाप्रकारे पहिल्यांदाच घरामध्ये दोघांचं भांडणं सुरु असताना इतरांनी त्या भांडणाची मजा लुटली. आज बिग बॉस मराठीच्या घरात कॅप्टनसी कार्य पार पडणार असून कोण कॅप्टन होणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. सध्या बिग बॉस मराठीच्या घरात वर्षा उसगांवकर कॅप्टनची जबाबदारी सांभाळत आहेत.

Web Title: heated argument between DP dhananjay powar with Abhijeet sawant and Nikki tamboli in bigg boss marathi 5

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.