‘वजनदार’ने केली रॉक आॅनवर मात
By Admin | Published: November 16, 2016 03:45 AM2016-11-16T03:45:55+5:302016-11-16T09:17:44+5:30
मराठी चित्रपटांना मल्टिप्लेक्स मिळत नाहीत अशी आरडाओरड आपण नेहमीच ऐकतो. फक्त सिंगल स्क्रिन थिएटरर्सवरच मराठी चित्रपट
tyle="text-align: justify;">मराठी चित्रपटांना मल्टिप्लेक्स मिळत नाहीत अशी आरडाओरड आपण नेहमीच ऐकतो. फक्त सिंगल स्क्रिन थिएटरर्सवरच मराठी चित्रपट लागतो आणि तो लगेच उतरतोही. परंतु नुकत्याच प्रदर्शित झालेल्या वजनदार या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर चांगली कमाई करून रॉक आॅन या हिंदी चित्रपटालाही मागे टाकले आहे. एवढेच नाही तर वजनदार चित्रपटाचे शोज मल्टिप्लेक्समध्ये वाढविण्यातदेखील आले आहेत. रॉक आॅन हा चित्रपट पाहायला येणाऱ्या प्रेक्षकांची संख्या कमी असल्याने चित्रपट थिएटरमधून काढण्यात आल्याचे पाहायला मिळतेय.
वजनदार चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर पहिल्याच दिवशी ७० ते ८० टक्के ओपनिंग करत आपले स्थान भक्कम केले. तर रॉकआॅनसारख्या बड्या स्टारकास्ट असलेल्या चित्रपटाला केवळ ३0 ते ३५ ओपनिंगवर समाधान मानावे लागले. सिटीप्राईड या मल्टिप्लेक्स चित्रपटगृहातून रॉकआॅन या चित्रपटाचा शो काढून त्याठिकाणी वजनदार चित्रपटाचे शो लावण्यात आले आहेत. या चित्रपटगृहाच्या मॅनेजर सुगत थोरात यांनी वजनदारच्या वाढवलेल्या शोजबद्दल लोकमत सीएनएक्सशी संवाद साधताना सांगितले की, ''आम्ही वजनदारचे दोन शोज लावले होते. परंतु पहिल्याच दिवशी या चित्रपटाला जवळपास ७० ते ८० टक्के ओपनिंग मिळाले. तर रॉकआॅन या चित्रपटाला फक्त ३० ते ३५ टक्के ओपनिंग मिळाले होते. म्हणूनच आम्ही रॉकआॅनचे शो रद्द करून वजनदारचे दोन शोज वाढवले आहेत.'' वजनदार या चित्रपटाच्या वाढवलेल्या शोजचा आम्हाला नक्कीच फायदा होईल असे दिसतेय. प्रेक्षक फक्त चांगला आशय असेल तरच चित्रपट पाहायला येतात. विकेंडला मराठी चित्रपट चांगली कमाई करतातच. तसेच हजार आणि पाचशेच्या नोटांचाही फटका या चित्रपटाला बसलेला नाही. वजनदारचे प्रेक्षक आॅनलाईन बुकिंग करताहेत. तसेच आम्ही तिकीट काऊंटरवर देखील डेबिट आणि क्रेडिट कार्ड स्वीकारण्याची सोय केली होती. त्यामुळे या गोष्टींचाही फायदा चित्रपटाला झाला असल्याचे दिसले असेही त्या म्हणाल्या.
वजनदार या मराठी चित्रपटासाठी सई आणि प्रियाने प्रचंड वजन वाढवले होते. या चित्रपटाचा ट्रेलर, गाण्यांना प्रेक्षक पसंती देताना दिसतायेत. वजनदार या चित्रपटासाठी रॉकआॅनसारख्या हिंदी चित्रपटाला मल्टिप्लेक्स सिनेमागृहात जागा मिळाली नसल्याने मराठी चित्रपटाचे पाऊल पडते पुढे असेच म्हणावे लागेल.