दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना ‘मिफ्टा’ करणार मदत

By Admin | Published: September 17, 2015 02:25 AM2015-09-17T02:25:21+5:302015-09-17T02:25:21+5:30

मराठी चित्रपटांना ग्लोबल मार्केट मिळवून देणारा सहावा कलर्स मिफ्ता सोहळा येत्या २६ ते ३१ जानेवारी २०१६ दरम्यान आॅस्टेलियात रंगणार आहे़ मिक्टा

Helps Drought-hit Farmers to 'Mifta' | दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना ‘मिफ्टा’ करणार मदत

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना ‘मिफ्टा’ करणार मदत

googlenewsNext

मराठी चित्रपटांना ग्लोबल मार्केट मिळवून देणारा सहावा कलर्स मिफ्ता सोहळा येत्या २६ ते ३१ जानेवारी २०१६ दरम्यान आॅस्टेलियात रंगणार आहे़ मिक्टा (मराठी इंटरनॅशनल फिल्म अँड थिएटर)च्या आयोजकांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना एक कोटीचा निधी देण्याचे जाहीर केले आहे.
सोहळ्याचे संपूर्ण संयोजन मेधा मांजरेकर आणि दीपा गाडगीळ हे सांभाळणार आहेत़ ज्येष्ठ निर्माता आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर हे या क्रिएटीव्ह कामाकडे अधिकाधिक लक्ष देणार आहेत़ या सोहळ्यात डी़ वाय़ पाटील यांना ‘गर्व महाराष्ट्राचा’ या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे़ या सोहळ्याअगोदर पूर्वरंग सोहळा २७ ते ३० डिसेंबर २०१५ ला आयोजित केला आहे़ महाराष्ट्र राज्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात मराठी सिनेमाची पताका जगभरात पोहचविण्यासाठी २०१० मध्ये ‘मिफ्ता’ पुरस्काराला सुरुवात झाली़ जगातील विविध देशांमधील शहरात दोन-तीन दिवसांचे कार्यक्रम आयोजित करावे़ तेथे मराठी नाट्य-चित्रपट कलावंतांची तेथील प्रेक्षकांशी थेट भेट घडवणे व उत्कृष्ट चित्रपट, नाटकांना पुरस्कार देणे, असे या कार्यक्रमाचे स्वरूप आहे़
निर्माता दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी हे प्रत्यक्षात आणले़ त्याबरोबर मराठी चित्रपटांना जगभरातील विविध देशांतील २२ शहरांमध्ये चित्रपट प्रदर्शित करणे व शूटिंगसाठी सहकार्य करण्यासाठीही या प्लॅटफार्मचा उपयोग केला जातो़

Web Title: Helps Drought-hit Farmers to 'Mifta'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.