‘हेमलकसा’ आॅस्करच्या स्पर्धेतून बाहेर

By Admin | Published: January 22, 2016 02:05 AM2016-01-22T02:05:15+5:302016-01-22T02:05:15+5:30

डॉ. प्रकाश बाबा आमटे द रिअल हिरो’ या मराठी चित्रपटाच्या प्रचंड यशानंतर समृद्धी पोरे यांनी ही फिल्म्स जास्तीत-जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हिंदीत

'Hemalkasa' out of Oscars competition | ‘हेमलकसा’ आॅस्करच्या स्पर्धेतून बाहेर

‘हेमलकसा’ आॅस्करच्या स्पर्धेतून बाहेर

googlenewsNext

‘डॉ. प्रकाश बाबा आमटे द रिअल हिरो’ या मराठी चित्रपटाच्या प्रचंड यशानंतर समृद्धी पोरे यांनी ही फिल्म्स जास्तीत-जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हिंदीत बनविण्याचा निर्णय घेतला होता आणि परत शूटिंग करून डॉ. आमटेंच्या जीवनावर हिंदीत ‘हेमलकसा’ या नावाने चित्रपट बनवला.
ज्या वेळी दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणेचा कोर्ट आॅस्करच्या स्पर्धेतून बाहेर पडला होता. त्याचवेळी ‘हेमलकसा’ चित्रपट ‘हेमलकसा’ हा हिंदी चित्रपट आॅस्करच्या फायनल राऊंडमध्ये जाऊन पोहोचला होता. जवळपास ३ ते ४ महिन्यांपासून विविध अडथळ्यांमधून पुढे जात या चित्रपटाने फायनल राऊंडमध्ये पोहोचण्यात यश मिळवले होते. या चित्रपटाचे सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि बेस्ट फिल्म या तीन विभागांमध्ये हेमलकसाची इतर चित्रपटांसोबत चुरशीची स्पर्धा सुरू होती. आॅस्करमध्ये शेवटपर्यंत टिकून राहण्याचा मान ‘हेमलकसा’ या एकमेव हिंदी चित्रपटाने पटकावला आहे. मात्र ‘आॅस्कर’ फायनल राऊंडमध्ये पोहोचल्यानंतर स्पर्धेतून बाहेर पडल्यामुळे चित्रपटसृष्टीतील कलाकार आणि प्रेक्षकांमध्ये नाराजी पसरली आहे. हेमलकसा ही समृद्धी पोरेंची पहिलीच हिंदी फिल्म असून पदार्पणातच जगातल्या सर्वोत्तम चित्रपटाच्या यादीत जाण्याचा बहुमान त्यांना लाभला आहे. समृद्धी पोरे याबद्दल सांगतात, ‘‘मी आॅस्करच्या फायनल राऊंडपर्यंत पोहोचल्याचा मला आनंदच आहे आणि मला त्याबद्दल अभिमानही वाटतो. या चित्रपटाचे प्रेक्षक आणि स्वत: डॉ. प्रकाश बाबा आमटेंनी भरभरून कौतुक केले आहे. हे कौतुक माझ्यासाठी आॅस्करपेक्षाही महत्त्वाचे वाटते. इतकेच नाही तर या चित्रपटाच्या निमित्ताने जगातील सर्वोत्कृ ष्ट ज्युरींनी डॉ. प्रकाश आमटेंचे काम पाहिले आहे, याचा मला सर्वात जास्त आनंद आहे. हीच खरं तर मोठी कामगिरी मला वाटते.’’

Web Title: 'Hemalkasa' out of Oscars competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.