लग्नाला 40 वर्षे होऊनही हेमा मालिनी यांनी आजपर्यंत पाहिले नाही पती धर्मेंद्र यांचे वडिलोपार्जित घर,जाणून घ्या कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2021 02:27 PM2021-06-08T14:27:39+5:302021-06-08T14:43:26+5:30
लग्नानंतर धर्मेंद्र आणि हेमामालिनी यांच्यातली केमिस्ट्री पडद्यावर आणखी खुलू लागली... अलीबाबा और चालीस चोर, सम्राट, रझिया सुल्तान, या सिनेमात दोघांच्या जोडीला रसिकांनी डोक्यावर घेतलं. लग्नानंतर वेगवेगळ्या गोष्टींमुळे हे कपल चर्चेत राहिले.
बॉलीवुड स्टार आणि अफेयरच्या चर्चा हे काही जणू समीकरणच.. याला हेमामालिनीही अपवाद ठरल्या नाहीत... रसिकांसोबत त्या जमान्याचे स्टार कलाकारही ड्रीमगर्लच्या सौंदर्यावर फिदा झाले...रियल लाइफमध्ये धरमपाजींची ड्रीमगर्ल बनल्यानंतरही हेमामालिनी यांनी सिनेमात काम करणं सोडलं नाही... लग्नानंतर धर्मेंद्र आणि हेमामालिनी यांच्यातली केमिस्ट्री पडद्यावर आणखी खुलू लागली... अलीबाबा और चालीस चोर, सम्राट, रझिया सुल्तान, या सिनेमात दोघांच्या जोडीला रसिकांनी डोक्यावर घेतलं. लग्नानंतर वेगवेगळ्या गोष्टींमुळे हे कपल चर्चेत राहिले. कपलचे खासगी आयुष्यातील अनेक किस्से आजही चर्चेत असतात.
लग्नानंतर धर्मेंद्र आणि हेमा मालिनी वेगळेच राहत होते. इतकेच काय तर धर्मेंद्र यांचे घर हेमा मालिनी यांच्या घरापासून फक्त ५ मिनिटांवर होते. तरीही हेमा मालिनीने कधीच धर्मेंद्र यांच्या घराची पायरी चढली नाही. मुळात धर्मेंद्र यांचे हेमा मालिनीसोबतचे दुसरे लग्न होते. त्यामुळे धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नी प्रकाश कौर यांना त्यांच्यामुळे कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी त्यांनी त्यांच्याकडून जमेल तितकी काळजी घेतली.
धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नी प्रकाश कौर या लग्नामुळे नाराज होत्या. हेमा मालिनी कधीच त्यांच्या सासरी येणार नाहीत अशी अटच ठेवली होती. धर्मेंद्र आणि हेमा दोघांनीही प्रकाश कौर यांची अट मान्य केली आणि त्या एका कारणामुळे लग्नाला इतके वर्ष होऊनही आजपर्यंत हेमा मालिनी यांनी त्यांचे सासर पाहिलेले नाही.
धर्मेंद्र यांचे आई वडिल दोघांनाही या लग्नामुळे काहीच अडचण नव्हती. उलट दोघांनाही त्यांचे लग्न मान्य होते. अनेकदा धर्मेंद्र यांचे आई-वडिल हेमा आणि मुलींना भेटण्यासाठी त्यांच्या घरी जायचे असेही बोलले जाते. धर्मेंद्र यांचे वडिल कृष्णसिंग देओल यांना हेमा यांचे कुटुंब फार आवडले होते. म्हणून ते हेमाच्या कुटुंबालाही भेटण्यासाठी जायचे.
धर्मेंद्र यांचे भाऊ अजितसिंग देओल फार आजारी होती. ईशाही अजित यांची लाडकी होती. त्यांना भेटण्यासाठी ईशा पहिल्यांदा तिच्या आजी- आजोबांच्या घरी गेली होती. ईशा आणि आहाना दोघांचेही अजितसिंग फेव्हरेट काका होते. ईशानेच सावत्र भाऊ सनी देओलला फोन करुन काकांना भेटण्याची खास विनंती केली होती. सनी देओलनेही मुलींना काकांना भेटण्याची परवानगी दिली. ३४ वर्षांची झाली तेव्हा पहिल्यांदा ईशाने तिच्या आजी आजोबांचे घर पाहिले. अशारितीने पहिल्यांदाच हेमा यांच्या मुली धर्मेंद्र यांच्या वडिलोपार्जित घरी पोहचल्या पण हेमा मालिनी यापासून कायमच्या वंचितच राहिल्या.