रिया चक्रवर्ती हाजिर हो... ५०० कोटींच्या फसवणूक प्रकरणी बॉलिवूड अभिनेत्रीला पोलिसांचे समन्स

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2024 08:43 PM2024-10-05T20:43:30+5:302024-10-05T20:44:19+5:30

Rhea Chakraborty summoned by police: प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यू प्रकरणातही रिया चक्रवर्तीवर विविध आरोप करण्यात आले होते

Hibox app fraud case of rupees 500 crores Rhea Chakraborty summoned by Delhi police cyber cell | रिया चक्रवर्ती हाजिर हो... ५०० कोटींच्या फसवणूक प्रकरणी बॉलिवूड अभिनेत्रीला पोलिसांचे समन्स

रिया चक्रवर्ती हाजिर हो... ५०० कोटींच्या फसवणूक प्रकरणी बॉलिवूड अभिनेत्रीला पोलिसांचे समन्स

Rhea Chakraborty summoned by Delhi police: Hibox App फसवणूक प्रकरणात अनेक YouTubers आणि चित्रपट कलाकारांची नावे जोडली जात आहेत. यामध्ये बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्तीचेही नाव जोडले गेलेले आहे. दिल्लीपोलिसांच्या स्पेशल सेल IFSO (Intelligence Fusion and Strategic Operations) ने या प्रकरणी रियाला नोटीस बजावली आहे. या फसवणुकी प्रकरणी रियाची चौकशी होणार असल्याने तिला समन्स बजावण्यात आले आहे.

नक्की प्रकरण काय?

रिया आणि इतर अनेक YouTubers ने Hibox ॲपचा प्रचार केला आणि सामान्य जनतेला या ॲपमध्ये गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले. त्याचबरोबर या ॲपने गुंतवणूकदारांना दैनंदिन टप्प्यावर जास्त व्याज देण्याचे आश्वासन देऊन सुमारे ३० हजार लोकांची फसवणूक केली. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, फसवणुकीची रक्कम सुमारे ५०० कोटी रुपयांची असल्याचे समोर आले आहे. अशा परिस्थितीत दिल्ली पोलीस या ॲपची जाहिरात करणाऱ्या सर्व सेलिब्रिटींची चौकशी करत आहेत.

रिया चक्रवर्ती हाजिर हो...

रिया चक्रवर्तीला समन्स बजावण्यात आले असून ९ ऑक्टोबर रोजी दिल्लीतील द्वारका येथील सायबर सेल IFSO कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. या प्रकरणात आणखी काय सत्य उघड होते याकडे गुंतवणुक करणाऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. याच प्रकरणात रिया चक्रवर्तीसोबतच कॉमेडियन भारती सिंगलाही चौकशीसाठी बोलावले जाऊ शकते. मात्र, तिला अद्याप समन्स बजावण्यात आलेले नाही.

Hibox App चा मास्टरमाइंड पोलिसांच्या ताब्यात

Hibox App च्या माध्यमातून लोकांची फसवणूक करणारा मास्टरमाइंड पोलिसांच्या ताब्यात आहे. काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्या चार बँक खात्यांमधील १८ कोटी रुपयेही जप्त करण्यात आले आहेत. जमा केलेल्या रकमेवर दररोज १ ते ५ टक्के व्याज देण्याचे आश्वासन देऊन तो गुंतवणूकदारांची फसवणूक करत होता.

Web Title: Hibox app fraud case of rupees 500 crores Rhea Chakraborty summoned by Delhi police cyber cell

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.