वर्षा उसगांवकर की निक्की तांबोळी? 'बिग बॉस'साठी कोणाला मिळालं सर्वाधिक मानधन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2024 12:33 PM2024-08-08T12:33:48+5:302024-08-08T12:35:06+5:30

'बिग बॉस' मराठीचा पाचवा सीझन नुकताच भेटीला आला आहे.

highest paid Bigg Boss marathi contestants Varsha Usgaonkar or Nikki Tamboli | वर्षा उसगांवकर की निक्की तांबोळी? 'बिग बॉस'साठी कोणाला मिळालं सर्वाधिक मानधन

वर्षा उसगांवकर की निक्की तांबोळी? 'बिग बॉस'साठी कोणाला मिळालं सर्वाधिक मानधन

Bigg Boss Marathi Season 5 : 'बिग बॉस' मराठीचा पाचवा सीझन नुकताच भेटीला आला आहे.  यंदाचा सीझन पहिल्या दिवसापासून सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. पहिल्याच आठवड्यापासून या शोला प्रेक्षकांची पसंती मिळतेय. या सीझनमध्ये सर्वात जास्त चर्चा होतेय ती म्हणजे  90 च्या दशकात मोठा पडदा गाजवलेल्यादिग्गज अभिनेत्री वर्षा उसगांवकर (Varsha Usgaonkar) आणि अभिनेत्री निक्की तांबोळीची (Nikki Tamboli). या दोघीही यंदाचा बिग बॉस गाजवताना दिसून येत आहे. पण, यातच वर्षा आणि निक्की यांच्यात सर्वात जास्त मानधन कुणाला मिळालं, याची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगाताना दिसून येत आहे. 

यंदाच्या पर्वातील सर्वात चर्चेत राहिलेले स्पर्धक म्हणजे निक्की आणि वर्षा यांना किती मानधन मिळालंय, त्याची माहिती समोर आली आहे.  वर्षा उसगांवकर यांच्यापेक्षा निक्कीला जास्त मानधन मिळाल्याचं बोललं जात आहे. यंदाच्या पर्वामध्ये  सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री निक्की तांबोळी आहे. 'बिग बॉस मराठी'साठी निक्कीला ३ लाख ७५ हजार रुपयांचं मानधन मिळतेय. तर, वर्षा उसगांवकर यांना दर आठवड्याला २ लाख ५० हजार रुपये मानधन मिळत असल्याची माहिती आहे. 


"बिग बॉस मराठी'च्या घरात हळूहळू सर्व सदस्य बिग बॉसचा गेम समजताना आणि आपला खेळ खेळताना दिसत आहेत. वर्षा उसगांवकर, निखिल दामले, अंकिता वालावलकर, पंढरीनाथ कांबळे, योगिता चव्हाण, जान्हवी किल्लेकर, अभिजीत सावंत, घनश्याम दरवडे, इरिना रुडाकोवा, निक्की तांबोळी, वैभव चव्हाण, अरबाज पटेल, आर्या जाधव, पुरषोत्तम दादा पाटील, धनंजय पोवार, सूरज चव्हाण हे स्पर्धक प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. 
 

Web Title: highest paid Bigg Boss marathi contestants Varsha Usgaonkar or Nikki Tamboli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.