पाचव्या किमोथेरपीनंतर हिना खानने व्यक्त केल्या भावना, म्हणाली, "काही दिवस खूप खूप..."

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2024 02:09 PM2024-09-03T14:09:32+5:302024-09-03T14:09:57+5:30

हिना खानने व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना तिच्या तब्येतीचे अपडेट्स दिले आहेत.

Hina Khan shared video says she was vanished because she was healing through with 5th chemotherapy | पाचव्या किमोथेरपीनंतर हिना खानने व्यक्त केल्या भावना, म्हणाली, "काही दिवस खूप खूप..."

पाचव्या किमोथेरपीनंतर हिना खानने व्यक्त केल्या भावना, म्हणाली, "काही दिवस खूप खूप..."

अभिनेत्री हिना खान (Hina Khan) ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज देत आहे. काही दिवस ती सोशल मीडियावरुन गायब होती. त्यामुळे तिची तब्येत ठीक आहे ना, ती कशी आहे असे प्रश्न चाहते विचारत होते. कालच हिनाने व्हिडिओ शेअर करत तिच्या तब्येतीविषयी माहिती दिली. किमोथेरपीमुळे तिला प्रचंड वेदना होत आहेत. या वेदना थांबाव्या म्हणून ती स्वत:ला पुरेसा वेळ देत होती. हिना काय म्हणाली वाचा.

हिना खानने व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना तिच्या तब्येतीचे अपडेट्स दिले आहेत. ती म्हणते, "हॅलो, कसे आहात तुम्ही? काय चाललंय? माझ्या आयुष्यात काय चाललंय याचं थोडक्यात अपडेट द्यावं असा मी विचार केला. मला माहितीये कधीकधी मी सगळीकडून अचानक गायब होते. मग तुम्ही काळजीत पडता की मी कुठे गेले, ठिक आहे की नाही याची चिंता तुम्हाला वाटते मला माहित आहे. मी ठीक आहे. माझी पाचवी किमोथेरपी झाली. आणखी तीन राहिल्या आहेत."


ती पुढे म्हणाली, "काही दिवस कठीण असतात. खूप खूप कठीण असतात. काही दिवस चांगले असतात. जसं की आजचा दिवस आहे. आज मला छान वाटतंय. कधीकधी मी गायब होते स्वत:ला वेळ देते. बाकी सगळं ठीक आहे. माझ्यासाठी प्रार्थना करा. ही एक फेज आहे ती नक्कीच निघून जाईल. मी यातून नक्की बाहेर पडेन. मला माझ्या डॉक्टरांवर पूर्ण विश्वास आहे आणि मी लढत आहे. माझ्यासाठी प्रार्थना करा. खूप प्रेम."

हिना खानच्या या व्हिडिओवर रश्मी देसाई, रुबिना,  मेघा धाडे, लता सबरवाल यांनी कमेंट करत तिला धीर दिला आहे. तसंच चाहत्यांनीही ती लवकर बरी व्हावी म्हणून प्रार्थना केली आहे. 

Web Title: Hina Khan shared video says she was vanished because she was healing through with 5th chemotherapy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.