हिना खानच्या बोल्ड अंदाजाची चर्चा, फोटो व्हायरल!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2018 05:11 PM2018-08-07T17:11:19+5:302018-08-07T17:12:09+5:30

आपल्या चाहत्यांचं लक्ष वेधण्यासाठी हिना सोशल मीडिया अकाऊंटवर नेहमी हॉट फोटो शेअर करत असते. काही दिवसांपूर्वी हिना ही इंग्लंडला गेली होती.

Hina Khan's new bold photo shoot goes viral | हिना खानच्या बोल्ड अंदाजाची चर्चा, फोटो व्हायरल!

हिना खानच्या बोल्ड अंदाजाची चर्चा, फोटो व्हायरल!

googlenewsNext

मुंबई : बिग बॉस या शोमधील एक्स कंटेस्टंट आणि छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री हिना खान हीला चर्चेत कसं रहायचं हे चांगलंच माहीत आहे. आपल्या चाहत्यांचं लक्ष वेधण्यासाठी हिना सोशल मीडिया अकाऊंटवर नेहमी हॉट फोटो शेअर करत असते. काही दिवसांपूर्वी हिना ही इंग्लंडला गेली होती. इथे तिने एक खास फोटोशूट केलंय.

इंग्लंडला केलेल्या फोटोशूटचे काही व्हिडीओ आणि फोटो हिना सतत सोशल मीडियात शेअर करताना दिसत आहे. याच फोटोशूटमधील दोन नवे फोटो हिनाने शेअर केले असून या फोटोंना तिच्या चाहत्यांकडून पसंती मिळत आहे. या फोटोत हिना फारच हॉट आणि बोल्ड दिसत आहे.  

हिनाचे हे गुलाबी ड्रेसमधील फोटो सोशल मीडियात चांगलेच व्हायरल झाले आहे. काही तासांपूर्वी शेअर केलेल्या या फोटोंना १ लाख ७३ हजारांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. 

realhinakhan_37718759_258369021431052_6382489717329362944_n

शिल्पा शिंदेने भलेही बिग बॉस ११ जिंकलं असेल पण हिना खान सर्वात जास्त लोकप्रिय ठरली. हिनाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यापासून हिना पूर्णपणे बदलली आहे. तिचा हा ग्लॅमरस लूक आणि अंदाज तिच्या चाहत्यांना चांगलाच भावला आहे. 

काही दिवसांपासून हिना टीव्हीपासून दूर आहे. अशी चर्चा आहे की, हिना बॉयफ्रेन्ड रॉकीसोबत 'नच बलिए'मध्ये डान्स करताना दिसणार आहे. तर एकता कपूरच्या एका मालिकेतही ती दिसणार असल्याची चर्चा आहे. 

Web Title: Hina Khan's new bold photo shoot goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.