मुंबई, दि. 14 - प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक ए आर रेहमान यांचा एक लाईव्ह कॉन्सर्ट नुकताच लंडन येथे पार पडला. अत्यंत मितभाषी असलेल्या ए आर रेहमान यांच्या या कॉन्सर्टवर चाहते मात्र प्रचंड नाराज झाले आहेत. सोशल मीडियावर तर ए आर रेहमान यांच्यावरुन चाहत्यांमध्येच सोशल वॉर सुरु झालं आहे. कॉन्सर्टला हजेरी लावलेल्या अनेकांनी ए आर रेहमान यांनी जास्तीत जास्त तामिळ गाणी गायली असल्याचं सांगत टीका केली आहे. विशेष म्हणजे ए आर रेहमान स्वत: तामिळ असून त्यांनी तामिळ भाषीतील अनेक गाणी कम्पोज केली आहे. मात्र असं असतानाही चाहत्यांनी त्याकडे मात्र दुर्लक्ष केला असल्याचा आरोप रेहमान यांच्या समर्थकांनी केला आहे.
आणखी वाचा
काही दिवसांपुर्वी लंडनमधील वेम्बली शहरात त्यांचा एक लाईव्ह कॉन्सर्ट पार पडला. कॉन्सर्ट चांगला होता, मात्र कॉन्सर्टला हजेरी लावणारे अनेक जण नाराज होऊन निघून गेले. ए आर रेहमान यांनी फक्त तामिळ भाषेतील गाणीच गायली असा आरोप त्यांनी केला आहे. यामुळे काहींनी अर्ध्यातच कॉन्सर्ट सोडून जाणं पसंद केलं.
काहीजणांनी तर ए आर रेहमान यांनी आपल्याला धोका दिल्याचाच आरोप केला आहे. आपण मोठ्या उमेदीने त्यांची हिंदी गाणी ऐकायला आलो होतो, मात्र आपला भ्रमनिरास झाला असं त्यांनी म्हटलं आहे.
काही प्रेक्षकांनी तर आयोजकांकडून आपले पैसे परत मागितले आहेत. यानंतर सोशल मीडियावर तामिळ आणि हिंदी भाषिक चाहत्यांमध्ये सोशल युद्ध सुरु झालं आहे.
तामिळ चाहत्यांचं म्हणणं आहे की, या कॉन्सर्टचं नाव ‘नेत्रु, इंद्रु, नलाई’ असं होतं. याचा अर्थ "काल, उद्या आणि परवा" असा होतो. चाहत्यांनी सांगितल्याप्राणे जर कोणाला तामिळ भाषा समजत नाही, तर कमीत कमी कार्यक्रमाचं नाव वाचून तरी तिथे कोणती गाणी ऐकायला मिळतील हे लक्षात यायला हवं होतं.
याशिवाय अजून एक मुद्दा चर्चेला आला आहे तो म्हणजे हिंदी भाषेसमोर इतर प्रादेशिक भाषांना कमी महत्व का दिलं जात आहे.ए आर रेहमान यांच्याबद्दल वेगळं काही सांगायची गरज नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावरही रेहमान यांनी स्वत:ला सिद्ध केलं आहे. "स्लमडॉग मिलिनिअर" चित्रपटासाठी त्यांनी ऑस्करही पटकावला आहे. ए आर रेहमान यांना 1992 साली मनी रत्नम यांच्या रोजा चित्रपटातून ब्रेक मिळाला होता. हा तामिळ चित्रपट होता, जो हिंदी भाषेतही डब करण्यात आला. यानंतर रेहमान यांनी तामिळ आणि तेलगू दोन्ही चित्रपटसृष्टीत काम केलं. 1995 मध्ये आलेला "रंगीला" चित्रपट ख-या अर्थाने त्यांचा पहिला हिंदी चित्रपट होता.
Web Title: "Hindi" fans angry with AR Rahman's "Tamil" concert
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.