डीपनेक बॉडीकॉन ड्रेसमध्ये 'गोपी बहू'ने फ्लॉन्ट केला बेबी बंप; ३८ व्या वर्षी अभिनेत्री होणार आई

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2024 03:42 PM2024-09-21T15:42:12+5:302024-09-21T15:49:41+5:30

अगदी काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जीने सोशल मीडियावर फोटो शेअर करत चाहत्यांसोबत एक गुड न्यूज शेअर केली होती.

हिंदी मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जी लवकरच आई होणार आहे. लवकरच देवोलिनाच्या घरी पाळणा हलणार आहे.

अगदी काही दिवसांपूर्वीच देवोलिनाने इन्स्टाग्रामवरुन पोस्ट शेअर करत आई होणार असल्याचं सांगितलं.

नुकतेच तिने स्वत:च्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर काही खास फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये अभिनेत्री तिच्या नवऱ्यासोबत रोमँटिक अंदाजात फोटो क्लिक केलेत.

घरातील बाल्कनीमध्ये देवोलिनाने हे फोटो काढलेत. शिवाय डीपनेक बॉडीकॉन ड्रेसमध्ये अभिनेत्री बेबी प्लॉन्ट करताना दिसते आहे.

देवोलिनाने सोशल मीडियावर "Parents To Be" असं कॅप्शन देते तिचे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

देवोलिनाने २०२२ साली शाहनवाज शेखसोबत लग्नगाठ बांधली होती. देवोलिनाचा पती शाहनवाज हा एक जीम ट्रेनर आहे.

लग्नानंतर आता दोन वर्षांनी देवोलिना आणि शाहनवाज आईबाबा होणार आहे. नव्या पाहुण्याची चाहुल लागल्याने त्यांचे कुटुंबीयही आनंदी आहेत.