प्रेग्नंसीमुळे अभिनेत्री श्रद्धा आर्याने सोडली 'कुंडली भाग्य' मालिका; सोशल मीडियावर शेअर केली भावुक पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2024 11:29 AM2024-11-20T11:29:30+5:302024-11-20T11:33:19+5:30
'कुंडली भाग्य' फेम अभिनेत्री श्रद्धा आर्याने सोशल मीडियावर नुकतीच एक भावुक पोस्ट शेअर केली आहे.
Shraddha Aarya : झी टीव्ही वाहिनीवरील 'कुंडली भाग्य' (kundali Bhagya) या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे श्रद्धा आर्या (Shraddha Aarya) मागील काही दिवसांपासून श्रद्धा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. लवकरच अभिनेत्रीच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. लग्नानंतर ३ वर्षांनी श्रद्धाच्या घरी पाळणा हलणार आहे. श्रद्धाने तिच्या इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडिओ शेअर करत ही गुडन्यूज चाहत्यांना दिली होती.कुंडली भाग्य मालिकेत प्रीताची भूमिका तिने उत्तमरित्या वठवली. आपल्या सहज सुंदर अभिनयाने श्रद्धाने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. दरम्यान, सोशल मीडियावर अभिनेत्रीने शेअर केलेल्या पोस्टमुळे चाहत्यांना धक्का बसला आहे. श्रद्धाने या पोस्टद्वारे कुंडली भाग्य मालिका तिने सोडण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं आहे. मागील काही ७ वर्षांपासून श्रद्धा या मालिकेत मुख्य पात्र साकारत होती. परंतु वैयक्तिक कारणांमुळे या मालिकेत आपण काम करणार नसल्याचं तिने स्पष्ट केलं आहे.
श्रद्धा आर्याने इन्स्टाग्रावर पोस्ट शेअर करत त्यामध्ये लिहलंय, तुम्हाला विश्वास बसणार नाही परंतु मी २५ वेळा कॅप्शन लिहून डिलीट केलं आहे. कारण माझ्याकडे शब्दच नाही आहेत. ज्याद्वारे मी व्यक्त होऊ शकेन. ते क्षण जेव्हा मी माझ्या आयुष्यातील यश, समाधान अनुभवलं आता मी या कामातून ब्रेक घेते आहे. 'कुंडली भाग्य' सिरिअलने मला खूप काही दिलंय. एक अल्लड मुलगी त्यानंतर लग्न आणि आता जबाबदार आई असा तो प्रवास होता. त्यावरून तुम्हाला अंदाज येईलच की हा प्रवास माझ्यासाठी किती महत्वाचा आहे.
पुढे अभिनेत्रीने लिहलंय, "प्रीताची साडेसात वर्षे, फॅन्सी कपडे, प्रसिद्धी, लोकप्रियता, अप्रतिम टीम आणि सहकलाकार, प्रवास, ग्लॅमर, आव्हानात्मक दृश्ये, नृत्य, नाटक आणि कलाकाराचे आयुष्य परिपूर्ण बनवणारं सर्व काही माझ्यासाठी परीकथेपेक्षा कमी नव्हतं. जीवनाच्या या अद्भुत अनुभवासाठी माझी निवड केल्याबद्दल एकता कपूरचे आभार! झी टीव्ही, माझे सर्व सह-कलाकार, शोचे क्रू, दिग्दर्शक, लेखक, सिनेमॅटोग्राफर, ADs, EPs, प्रॉडक्शन हेड, स्टायलिस्ट, ब्युटीफाइंग टीम, स्पॉट दादा यांच्यामुळे हा प्रवास सहज शक्य, यशस्वी, आरामदायक आणि खूप आनंदी झाला त्यामुळे सर्वांचे मनापासून आभार!"