हॉलिवूड सिनेमात 'बजरंगबली'! नेटकरी म्हणाले- 'आदिपुरूष'मध्ये हनुमान दिसले नाहीत तर...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2023 04:14 PM2023-06-21T16:14:36+5:302023-06-21T16:16:14+5:30
दोन्ही चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकले पण हॉलिवूड चित्रपटातील या पोस्टरची चर्चा रंगली
Hanuman poster in Hollywood Movie Flash, Adipurush Controversy: गेल्या शुक्रवारी 'आदिपुरुष' आणि 'द फ्लॅश' हे दोन बिग बजेट चित्रपट प्रदर्शित झाले. दोन्ही चित्रपटांचे कथानक वेगवेगळे असले तरी, त्यांच्यात एक गोष्ट समान आहे, ते म्हणजे दोन्ही चित्रपटांचा संबंध भगवान हनुमानाशी आहे. गेल्या आठवड्यात डीसी कॉमिक्सच्या चाहत्यांनी अमेरिकन सुपरहिरो चित्रपट 'द फ्लॅश' मधील एक चित्र शेअर केले. त्या चित्रपटात नायकाच्या खोलीत हनुमानाचे पोस्टर असल्याचे दिसले. बॅरी अॅलन (एझरा मिलर) आयरिस वेस्ट (किर्सी क्लेमन्स) यांना त्याच्या खोलीत ड्रिंक्ससाठी बोलवतो त्यावेळी मागे बजरंगबलीचे पोस्टर दिसते असे चाहत्यांनी सांगितले आहे. हॉलिवूडच्या चित्रपटात हनुमानाचे पोस्टर दिसल्याने आदिपुरूष चित्रपटाला पुन्हा एकदा ट्रोल केले जात आहे.
चित्रपटातील एका दृश्याचा स्क्रीनशॉट झाला व्हायरल
एका ट्विटर युजरने स्क्रीनशॉटचा फोटो शेअर करत लिहिले, "फ्लॅश चित्रपटात रूममध्ये हनुमानाचे पोस्टरही होते, मला वाटले की की मी थिएटरमध्ये आदिपुरुष पाहायला आलो की काय.." दुसर्या व्यक्तीने विनोद केला, "जर तुम्ही पुढे जाऊन आदिपुरुष पाहिलात आणि तुम्हाला भगवान हनुमान दिसले नाहीत तर निराश होऊ नका. तो आमच्याबरोबर आहेत आणि फ्लॅश चित्रपटात आले आहेत."
Main to #Flash dekhne jaa rha hu.....waha pe bhi lord hanuman hai.....#Adipurush to main ab galti se bhi nahi dekhunga😂😂 pic.twitter.com/K6Y6W642DA
— Prajwal Meshram (@MeshramPrajwal1) June 18, 2023
सुपरहिरो चित्रपटात हिंदू देवाचे पोस्टर कसे काय?
सेट डिझायनरने एका सुपरहिरो चित्रपटात हिंदू देवाचे पोस्टर का निवडले, ज्याचा हिंदू पौराणिक कथांशी फारसा संबंध नाही, याबद्दल लोकांनाही उत्सुकता आहे. लोकांनी याचे स्वागतच केले आहे. तसेच असा सवाल करत एका ट्विटर युजरने लिहिले की, “फ्लॅश चित्रपटात बॅरी ऍलनच्या खोलीत भगवान हनुमानाचे चित्र आहे. कोणाला कारण किंवा संदर्भ माहित आहे?
also, there was Hanuman's poster in Flash's room, I thought the theater was going to transition into adipurush pic.twitter.com/3WtkRtHf2n
— dead end, Straight (@yeah__me_only) June 16, 2023
दोन्ही चित्रपट वादाच्या भोवऱ्यात
आदिपुरुषला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून नकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्या, तर 'द फ्लॅश'ला मिश्र प्रतिक्रिया मिळाल्या. विशेष म्हणजे हे दोन्ही चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडले. आदिपुरुषच्या निर्मात्यांची कथा रेखा सुमार दर्जाची आणि भडक दृश्यांसाठी टीकेची धनी ठरली. त्याच वेळी, द फ्लॅशने अभिनेता एझरा मिलरला मुख्य भूमिका दिल्यावरून वाद निर्माण झाला. कारण त्याच्यावर सार्वजनिक आणि शारीरिक हल्ल्याचा आरोप आहे.