By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2016 09:56 PM2016-04-04T21:56:14+5:302016-04-04T14:56:14+5:30
रेती या सिनेमामध्ये चिन्मय मांडलेकरने रांगड्या ट्रक ड्रायव्हरची भुमिका उत्तम साकारण्याचा प्रयत्न केला ...
Next
/> रेती या सिनेमामध्ये चिन्मय मांडलेकरने रांगड्या ट्रक ड्रायव्हरची भुमिका उत्तम साकारण्याचा प्रयत्न केला आहे. चिन्मयने नूसतीच भुमिका साकारली नाही तर तो अक्षरश: ट्रक ड्रायव्हरला जगला. भुमिकेमध्ये जीव ओतुन काम त्याने केले असल्याचे त्याच्या पेहरावावरुन अन ट्रेलरच्या झलकमधुन दिसत आहे. सीएनएक्सला दिलेल्या खास मुलाखतीमध्ये चिन्मय सांगतोय, ही भुमिका करताना मला खरच खुप मजा आली. ट्रक चालविणे काही अवघड नाही कारण जशी आपण फोर व्हीलर चालवतो तसेच ट्रक चाललावी लागते. परंतू ट्रक मध्ये चढणे उतरणे अवघड वाटले. मला फक्त या गोष्टी शिकाव्या लागल्या. एवढेच नाही तर मी जो ट्रक रेतीमध्ये चालविला आहे तो ४० वर्ष जुना ट्रक आहे. त्यामुळे त्याची अवस्था काही फारशी चांगली नव्हती. चालवताना मला खुप कसरत करावी लागे पण नंतर या गोष्टींची सवय झाली. तो ट्रक आमच्या सिनेमामध्ये फक्त वस्तु म्हणुन वापरला नाही तर ते आमचे एक कॅरॅक्टरच आहे. ट्रक शिवाय हा सिनेमा अधुरा आहे. शंकºयाचे या ट्रकवर त्याच्या प्रेयसीपेक्षा जास्त प्रेम आहे अन तो लाडाने आपल्या ट्रकला राणी म्हणतो. अशा ट्रक बद्दलच्या गमती-जमती अन आठवणी चिन्मयने शेअर केल्या. आता पाहुयात चिन्मयचा हा ट्रक किती रेती वाहुन नेतोय ते.