​बेधडक चित्रपटातलं 'दमछाक....' गाणे सोशल मीडियात हिट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2018 04:42 AM2018-05-02T04:42:18+5:302018-05-02T10:12:18+5:30

कोणताही खेळ खेळण्यासाठी खेळाडूला अफाट कष्ट करावे लागतात, जीवतोड मेहनत ही करावीच लागते. एका बॉक्सरच्या घडण्याचे दर्शन घडवणारे "दमछाक...." ...

The hit 'Dhamchak ....' is a hit in social media | ​बेधडक चित्रपटातलं 'दमछाक....' गाणे सोशल मीडियात हिट

​बेधडक चित्रपटातलं 'दमछाक....' गाणे सोशल मीडियात हिट

googlenewsNext
णताही खेळ खेळण्यासाठी खेळाडूला अफाट कष्ट करावे लागतात, जीवतोड मेहनत ही करावीच लागते. एका बॉक्सरच्या घडण्याचे दर्शन घडवणारे "दमछाक...." हे बेधडक या चित्रपटातले गाणे सोशल मीडियात चांगलेच लोकप्रिय ठरले आहे. दमदार शब्द, उत्तम संगीत आणि अप्रतिम छायांकन ही या गाण्याची वैशिष्ट्ये आहेत. बेधडक हा चित्रपट १ जून रोजी प्रदर्शित होत आहे. 
राही प्रॉडक्शन्सच्या मंदार गोविंद टावरे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. गोविंद टावरे यांचे चित्रपट लेखन, सुरेश देशमाने यांची उत्तम सिनेमॅटोग्राफी तर मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, सुराज्य असे उत्तमोत्तम चित्रपट केलेल्या संतोष मांजरेकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
दमछाक या गाण्यात बॉक्सर कशा पद्धतीने घडतो याचे चित्रण करण्यात आले आहे. आपल्या प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली सराव करणे, त्याबरोबरच दमणे, खचणे, चिडचिड करणे या सगळ्या भावभावना या गाण्यात टिपल्या आहेत. उच्च दर्जाच्या सिनेमॅटोग्राफीमुळे हे गाणे पाहण्याचा अप्रतिम अनुभव मिळतो. त्यामुळेच या गाण्याला सोशल मीडियात उत्तम प्रतिसाद मिळत आहे. गाण्याविषयी दिग्दर्शक संतोष मांजरेकर सांगतात, 'दमछाक' हे गाणं खूप इंटरेस्टिंग आहे. त्यात एक प्रवास मांडण्यात आला आहे. खेळाडू कसा घडतो याचे हे एक प्रकारे दर्शन आहे. बेधडक हा खेळावर आधारित चित्रपट असल्याने तो तितक्याच उत्तम पद्धतीने चित्रीत करणे गरजेचे होते. निर्माते मंदार गोविंद टावरे यांनी पूर्ण स्वातंत्र्य दिल्याने चित्रपटाच्या निर्मिती मूल्यांमध्ये कोणतीही तडजोड केलेली नाही.'
गिरीश टावरे याचे अभिनेता म्हणून या चित्रपटातून पदार्पण होत असून अभिनेते अशोक समर्थ, गणेश यादव, सुश्रुत मंकणी, अनंत जोग, प्रसाद लिमये, अभिनेत्री नम्रता गायकवाड, स्नेहा रायकर, पूनम फणसे अशी या चित्रपटाची स्टारकास्ट आहे. प्रवीण शशिकांत जगताप याने कार्यकारी निर्माता म्हणून काम पाहिले आहे. मंगेश कांगणे, गोविंद टावरे आणि प्रवीण बांदेकर यांनी लिहिलेल्या गीतांना प्रवीण बांदेकर यांचे संगीत लाभले असून आदर्श शिंदे, सिद्धार्थ महादेवन, बेला शेंडे, आनंदी जोशी, प्रवीण बांदेकर यांच्या सुमधुर आवाजात गाणी स्वरबद्ध करण्यात आली आहेत.

Also Read : संतोष मांजरेकर दिग्दर्शित नवा अॅक्शनपॅक्ड चित्रपट 'बेधडक'

Web Title: The hit 'Dhamchak ....' is a hit in social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.