प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला ‘शौकीन’
By Admin | Published: November 10, 2014 10:25 PM2014-11-10T22:25:59+5:302014-11-10T22:25:59+5:30
गेल्या शुक्रवारी बॉक्स ऑफिसवर संपूर्ण वेगळ्या धाटणीचे चित्रपट प्रदर्शित झाले. राजा रवी वर्माच्या वादग्रस्त आयुष्याचा वेध घेणारा ‘रंगरसिया’ हा कलात्मक चित्रपट होता.
गेल्या शुक्रवारी बॉक्स ऑफिसवर संपूर्ण वेगळ्या धाटणीचे चित्रपट प्रदर्शित झाले. राजा रवी वर्माच्या वादग्रस्त आयुष्याचा वेध घेणारा ‘रंगरसिया’ हा कलात्मक चित्रपट होता. तर तीन वयस्कांची एका मुलीभोवती फिरणारी रंजक कथा ‘शौकीन’ चित्रपटात मांडण्यात आली होती. हा चित्रपट 8क् सालात बनलेल्या जुन्या शौकीन चित्रपटाचा रिमेक होता. त्यामुळे नव्या धाटणीत तो कसा बनेल, त्याला प्रतिसाद कसा मिळेल याचीही उत्सुकता अनेकांना होती. हीच उत्सुकता चित्रपटाच्या फायद्याची ठरली आणि तो हिट झाला. तर ‘रंगरसिया’ चित्रपटाला अपयशाचा फटका बसला.
शौकीन चित्रपटाने पहिल्या दिवशीच 5 कोटींपेक्षा जास्त कमाई केली. त्यामुळे चित्रपटाविषयी अपेक्षा वाढल्या होत्या. तसेच मीडियात प्रसिद्ध झालेल्या समीक्षेचा फायदा चित्रपटाला होऊन तीन दिवसांत चित्रपटाने एकूण 18 कोटींपेक्षा जास्त कमाई केली. हॅपी न्यू इयर चित्रपटाची ओसरलेली हवा आणि इतर नव्या चित्रपटांच्या वाईट अवस्थेचा पुरेपूर फायदा शौकीन’ चित्रपटाला झाल्याचे जाणकारांनी सांगितले.
तर 9 वर्षाच्या मोठय़ा कालावधीनंतर प्रदर्शित झालेल्या राजा रवी वर्माच्या आयुष्यावरच्या रंगरसिया’ला मात्र प्रेक्षकांनी साफ नाकारले. या चित्रपटात अनेक भडक दृश्ये तसेच अभिनेत्री नंदना सेनची निसर्गावस्थेतीलही दृश्ये होती. पण त्याचा काहीच फायदा चित्रपटाला झाला नाही. पहिल्या दिवशी त्याने 5क् लाखांच्या आसपास कमाई केली. तर तीन दिवसांत फक्त 2.5 कोटींची कमाई केली.
खूप मोठय़ा कालावधीनंतर एखादा चित्रपट प्रदर्शित होणो हे महत्त्वाचे मानले जाते. मात्र असे चित्रपट हमखास अपयशी ठरतात. अशा चित्रपटांच्या यादीत ‘रंगरसिया’ चित्रपटाला स्थान मिळाले आहे. तर हॅरी बवेजाची निर्मिती असलेल्या ‘चार साहिबजादे’ या अॅनिमेशन पटालाही अपयशाचा सामना करावा लागला आहे.
या चित्रपटांआधी प्रदर्शित झालेल्या चित्रपटांबाबत बोलायचे झाल्यास, रेखाच्या ‘सुपरनानी’ चित्रपटाने दुस:या आठवडय़ात फक्त 2.5 कोटींची कमाई केली. ही या चित्रपटासाठी लज्जास्पद बाब आहे. तर ‘रोर’ चित्रपटाने 7 कोटींच्या आसपास कमाई केली आहे. शाहरूख खानच्या ‘हॅपी न्यू इयर’ चित्रपटाने तिस:या आठवडय़ात 192 कोटी कमाई केली असली तरी 2क्क् कोटी क्लबमध्ये स्थान मिळवण्याची शक्यता कमीच आहे. येत्या शुक्रवारी यशराज कं पनीचा ‘किल-दिल’ प्रदर्शित होणार आहे. यात रणबीर सिंह, परिणीती चोपडा आणि अली जाफर असून निगेटिव्ह भूूमिकेत गोविंदा पाहायला मिळणार आहे.
यशराज बॅनरपटात पहिल्यांदाच गोविंदा अभिनय करत आहे. चित्रपटाच्या गाण्यांनी उत्सुकता वाढवली आहे.
च्शौकीन - हिट
च्रंग रसिया - सुपर फ्लॉप
च्सुपर नानी - सुपर फ्लॉप
च्रोर - फ्लॉप
च्हॅपी न्यू इयर - सुपरहिट