हॉलीवूडपटांचा बॉलीवूडला फटका

By Admin | Published: June 12, 2016 01:25 AM2016-06-12T01:25:12+5:302016-06-12T01:25:12+5:30

कमाईच्या लढाईत हॉलीवूडने बॉलीवूडमधील बड्या बॅनरच्या चित्रपटांना धोबीपछाड दिल्याने, हॉलीवूड बॉलीवूडवर सरस ठरत असल्याची चर्चा आता रंगू लागली आहे. नुकताच प्रदर्शित झालेला

Hollywood footage hit Bollywood | हॉलीवूडपटांचा बॉलीवूडला फटका

हॉलीवूडपटांचा बॉलीवूडला फटका

googlenewsNext

कमाईच्या लढाईत हॉलीवूडने बॉलीवूडमधील बड्या बॅनरच्या चित्रपटांना धोबीपछाड दिल्याने, हॉलीवूड बॉलीवूडवर सरस ठरत असल्याची चर्चा आता रंगू लागली आहे. नुकताच प्रदर्शित झालेला ‘हाउसफुल-३’ बॉक्स आॅफिसवर चांगली ओपनिंग करण्यात जरी यशस्वी ठरला असला, तरी येत्या काळात प्रदर्शित होणाऱ्या हॉलीवूडपटाशी या चित्रपटाला जबरदस्त फाइट द्यावी लागेल, हे निश्चित...

- हाउसफुल - 3 ५/२ निंजा टर्टल
साजिद नाडियाडवाला यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘हाउसफुल-3’ या कॉमेडी चित्रपटाने बॉक्स आफिसवर चांगली ओपनिंग करताना, पहिल्याच आठवड्यात वर्ल्डवाइड शंभर कोटी रुपयांपेक्षा अधिक गल्ला जमविला. २०१६ मध्ये अशी जबरदस्त ओपनिंग करणारा हा पहिलाच चित्रपट ठरल्याने, येत्या काळात हा चित्रपट कमाईचे आणखी रेकॉर्ड करेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. या आठवड्यात प्रदर्शित होणाऱ्या ‘निंजा टर्टल’, ‘कैजरिंग 2 : द एनफिल्ड पोल्टरगीस्ट’, ‘सुसाइड स्क्वैड’, ‘फनटास्टिक बीस्ट्स अँड व्हेयर टू फाइंड देम’ हे हॉलीवूडपट प्रदर्शित होणार असल्याने, हाउसफुल-3 ला जबरदस्त फाइट द्यावी लागणार आहे. ‘निंजा टर्टल’ हा बिग बजेट चित्रपट आहे. तो ‘हाउसफुल-3’ला टक्कर देऊ शकतो.

- फॅन ५/२ द जंगल बुक
८ एप्रिल रोजी भारतात प्रदर्शित झालेल्या ‘द जंगल बुक’ या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई करीत, पुढील तीन ते चार आठवडे दबदबा कायम ठेवला. यामुळे ‘द जंगल बुक’च्या आठवडभरानंतर प्रदर्शित झालेल्या सुपरस्टार शाहरूख खानच्या ‘फॅन’ या चित्रपटाला फारसा करिश्मा करता आला नाही, अन्यथा शाहरूखचा चित्रपट म्हटले की, काही दिवसांमध्ये शंभर कोटींचा क्लब निश्चित समजला जातो. मात्र, ‘द जंगल बुक’ने या चित्रपटाला अक्षरश: ब्रेक लावला. खरे तर फॅनने ‘द जंगल बुक’च्या (१० कोटी) तुलनेत पहिल्याच दिवशी १९ कोटी रुपयांचा आकडा पार केला होता. मात्र, त्यानंतर ९० कोटी रुपयांचा गल्ला जमविण्यासाठी फॅनला चांगलीच धडपड करावी लागली, तर ‘द जंगल बुक’ने तब्बल १८३ कोटी रुपयांची कमाई करून, आतापर्यंतच्या सर्व अ‍ॅनिमेडेट चित्रपटांच्या कमाईचे रेकॉर्ड ब्रेक करून नवे रेकॉर्ड तयार केले.

- फितूर ५/२ बॅटमॅन वर्सेस सुपरमॅन
कतरिना कैफ आणि आदित्य कपूर यांच्या ‘फितूर’ या चित्रपटालादेखील हॉॅलीवूडच्या ‘बॅटमॅन वर्सेस सुुपरमॅन’ व ‘डेडपूल’ या चित्रपटांचा फटका बसला. वास्तविक, ‘फितूर’ने चांगली ओपनिंग केली होती. मात्र, केवळ १९ कोटी रुपयांपर्यंत या चित्रपटाला मजल मारता आली. त्या तुलनेत बॅटमॅन वर्सेस सुपरमॅनने एकाच आठवड्यात ३६ कोटी रुपयांचा गल्ला जमविला, तर डेडपूलने २९ कोटी रुपये कमाविले. या चित्रपटांच्या फाइटमध्ये जॉन इब्राहमची मुख्य भूमिका असलेला ‘रॉकी हॅँडसम’ या चित्रपटाला सपाटून मार खावा लागला.

- सरबजीत ५/२ एक्स मॅन : एपाकलिप्स
बऱ्याच कालावधीनंतर बायोपिकमधून एंट्री करणाऱ्या ऐश्वर्या रॉय बच्चन यांच्या ‘सरबजीत’ या चित्रपटाकडून बॉॅलीवूडमध्ये कमाईच्या बऱ्याच अपेक्षा व्यक्त केल्या जात होत्या. चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात २२ कोटी रुपयांचा गल्लादेखील जमविला. मात्र, याच दरम्यान प्रदर्शित झालेल्या ‘एक्स मॅन : एपाकलिप्स’ या हॉॅलीवूडपटाने सरबजीत चित्रपटाची घोडदौड थांबविली. या चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात २६ कोटी रुपयांचा गल्ला जमविल्याने सरबजीतला अपयश स्वीकारावे लागले. असाच फटका ‘द अ‍ॅग्री बर्ड मूवी’ या चित्रपटाने राधिका आपटे हिचा ‘फोबिया’, ‘वीरप्पन’ आणि ‘वेटिंग’ या चित्रपटांना दिला.

बॉलीवूडचे नुकसान नाहीच
हॉलीवूडच्या सिनेमांमुळे बॉलीवूडचे नुकसान होत असेल, असे मला वाटत नाही. प्रेक्षक बॉलीवूडच्या चित्रपटांवर भरभरून प्रेम करतात. त्यामुळे साहजिक मी सकारात्मक विचार करेन. फटका वगैरे बसण्यापेक्षा आपल्याला त्यांच्याकडून काही नवीन गोष्टी शिकायला मिळतात, त्याकडेही बघितले पाहिजे.
- सई ताम्हणकर

प्रेक्षक विभागला जातो
या गोष्टीचा फटका नक्कीच फिल्म इंडस्ट्रीला बसेल. कारण हॉलीवूडमुळे इतर चित्रपटांना थिएटर्स मिळत नाही, तसेच खूप सारे आॅप्शन्स उपलब्ध असल्यामुळे प्रेक्षकही विभागला जातो.
- पूजा सावंत

दोन्हीचे आॅडियन्स वेगळे
हॉलीवूडमुळे बॉलीवूड व मराठी इंडस्ट्रीला फटका बसत असेल, मला वाटत नाही. कारण हॉलीवूडचा आॅडियन्स पूर्णपणे वेगळा असतो. आता, ‘द जंगल बुक’ या चित्रपटामुळे ‘सैराट’ या चित्रपटावर काही परिणाम झाला का? दोन्हीही चित्रपटांनी आपआपले यश बॉक्स आॅफिसवर मिळवलेच ना.
- भार्गवी चिरमुले

फटका बसतो हे खरे
हॉलीवूड चित्रपट पाहणे म्हणजे एक स्टेट्स आहे, असा विचार करणारा एक प्रेक्षकवर्गदेखील असतो. त्यामुळे याचा फटका मराठी व बॉलीवूडला बसतो, हे खरे आहे, तसेच प्रेक्षकांना पाहण्यासाठी पर्यायी चित्रपट असल्यामुळे प्रेक्षक विभागला जातो.
- चिन्मय उदगीरकर

satish.dongre@lokmat.com

Web Title: Hollywood footage hit Bollywood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.