लग्नानंतर काही तासांतच झोपेत हॉलिवूडच्या प्रसिद्ध गायकाचा मृत्यू झाला; पत्नीला धक्का बसला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2022 10:07 AM2022-12-01T10:07:59+5:302022-12-01T10:08:50+5:30
जेक फ्लिंटने 2016 मध्ये गायकीत पदार्पण केले. त्याच्या पहिल्या अल्बमचे नाव आय एम नॉट ओके होते. त्याचा दुसरा अल्बम 2020 मध्ये आला, ज्याला त्याने स्वतःचे नाव दिले.
हॉलिवूडचा प्रसिद्ध कंट्री सिंगर जेक फ्लिंट याचा मृत्यू झाला आहे. २६ नोव्हेंबरला त्याचे लग्न झाले होते. त्यानंतर काही तासांतच त्याचा झोपेत मृत्यू झाला. फ्लिंटच्या अचानक मृत्यूमुळे त्याची पत्नी ब्रेंडा आणि त्याचे कुटुंबीयाला धक्का बसला आहे. फ्लिंटच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झालेले नाही.
जेक फ्लिंट हा ३७ वर्षांचा होता, तो ओक्लाहोमाला राहणारा होता. त्याचा प्रसिद्धीप्रमुख क्लीफ डॉयलने याची माहिती दिली आहे. २६ नोव्हेंबरला लग्न झाल्यावर काही तासांतच झोपेत त्याचा मृत्यू झाला. पतीच्या अशा मृत्यूमुळे ब्रेंडाला मोठा धक्का बसला आहे. याबाबत तिने सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.
'आम्ही आता आमच्या लग्नाचे फोटो पाहिले पाहिजे होते, परंतु या क्षणी मला माझ्या पतीला कोणत्या कपड्यांमध्ये दफन करायचे याचा विचार करावा लागत आहे. लोकांच्या वाट्याला असे दु:ख येऊ नये. मला त्याची गरज होती, तो मला हवा होता, पण तो नाहीय हा विचार सहन करता येत नाहीय, असे तीने म्हटले आहे.
जेक फ्लिंटने 2016 मध्ये गायकीत पदार्पण केले. त्याच्या पहिल्या अल्बमचे नाव आय एम नॉट ओके होते. त्याचा दुसरा अल्बम 2020 मध्ये आला, ज्याला त्याने स्वतःचे नाव दिले. त्याचे फायरलाइन, व्हॉट्स युवर नेम ही गाणी बरीच प्रसिद्ध झाली होती.