अभिनेत्रीचा खुलासा, ‘इंडस्ट्रीत करिअर करू इच्छिणाºया तरुणींवर न्यूड सीन देण्यास आणला जातो दबाव’!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2018 10:33 AM2018-03-09T10:33:09+5:302018-03-09T16:03:09+5:30
प्रसिद्ध अभिनेत्री सिएरा पेटनने एक धक्कादायक खुलासा करताना म्हटले की, इंडस्ट्रीत करिअर करू इच्छिणाºया तरुणींना कशाप्रकारे न्यूड सीन देण्यास ...
प रसिद्ध अभिनेत्री सिएरा पेटनने एक धक्कादायक खुलासा करताना म्हटले की, इंडस्ट्रीत करिअर करू इच्छिणाºया तरुणींना कशाप्रकारे न्यूड सीन देण्यास भाग पाडले जाते. द वॉशिंगटन पोस्टच्या रिपोर्टनुसार, सिएरा जेव्हा १८ वर्षांची होती तेव्हा तिला २००७ मध्ये ‘फ्लाइट आॅफ फ्यूरी’ या चित्रपटात प्रसिद्ध अभिनेता स्टीवन सीगल याच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली होती. रोमानियात प्रोफेशनल अॅक्टिंग जॉबच्या रूपात हा तिचा पहिलाच चित्रपट होता. मात्र शूटिंगसाठी सेटवर पोहोचेपर्यंत तिला निर्माता किंवा इतर कोणीही स्क्रिप्ट दाखविली नव्हती. जेव्हा सिएरा विमानाने शूटिंगस्थळी जात होती, तेव्हा तिला कोणीतरी स्क्रिप्ट दिली. ही स्क्रिप्ट वाचल्यानंतर तिच्या लक्षात आले की, चित्रपटात एक सीन असा आहे, ज्यामध्ये अभिनेत्रीला अंघोळीनंतर नग्नावस्थेत दाखविले जाणार आहे.
याविषयी बोलताना सिएराने सांगितले की, ‘त्या सीनबद्दल वाचून मला धक्काच बसला होता. माझ्या तोंडून पहिलीच प्रतिक्रिया आली की, ‘माझी अशी भूमिका असणार आहे काय? माझ्या हृदयाचे ठोके वाढले होते.’ रिपोर्टनुसार, सिएरा सेटवर कोणालाच ओळखत नव्हती. शिवाय तिच्याकडे एवढे पैसेही नव्हते की, इंटरनॅशनल फोन करून कोणाशी बोलू शकेल. अशात सिएराने निर्णय घेतला की, ती हार मानणार नाही. तिला यशाचे शिखर सर करायचे होते. सिएराने हिंमत केली आणि स्टीवन सीगलच्या ट्रेलरमध्ये जाऊन त्याच्याशी संपर्क साधला. चित्रपटात संधी दिल्याबद्दल सीगरचे आभार मानून सिएराने त्याच्याशी न्यूड सीनबद्दल चर्चा केली. तसेच हा सीन करणे मला अवघड होणार असल्याचे त्याला सांगितले.
सिएराशी चर्चा केल्यानंतर सीगलने तिला बाहेर पाठविले आणि काही पुरुषांना आपल्या ट्रेलरमध्ये बोलावले. त्यानंतर पुन्हा एकदा त्याने सिएराशी बोलण्यासाठी तिला बोलावले. यावेळी सीगरने सर्वांसमोर तू खरंच न्यूड सीन करणार नाहीस काय? असे विचारले. तसेच ही तिचा टॉप काढू शकत नाही काय? असा इतरांना त्याने प्रश्न केला. तिथे उपस्थित असलेल्या लोकांपैकी एका व्यक्तींने म्हटले की, ‘तुला माहिती आहे काय, तुला या चित्रपटात हायर करण्यासाठी आम्ही आमच्या जिवाची बाजी लावली आहे?’
सिएराच्या मते, चित्रपट आणि टीव्ही जगतात अभिनेत्रींना न्यूड सीन करण्यासाठी भाग पाडले जाते. निर्माता आणि दिग्दर्शकांकडून तर अभिनेत्रीला शिवीगाळ केली जाते. त्याचबरोबर जिवे मारण्याची धमकीही दिली जाते. डिसेंबर २०१७ च्या न्यूयॉर्क टाइम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या एका लेखानुसार, प्रसिद्ध अभिनेत्री सलमा हायेकने म्हटले होते की, लैंगिक शोषणाचे आरोप असलेले निर्माता हार्वे विंस्टनने मला धमकी दिली होती की, जर मी अन्य अभिनेत्रींप्रमाणे सेक्स सीन दिले नाहीत तर २००२ मध्ये आलेल्या ‘फ्रीडा’ या चित्रपटाचे ते प्रोडक्शन बंद करणार. अशाच प्रकारे अभिनेत्री साराह जेसिका पार्कर आणि डेबरा मेसिंगनेही निर्मात्यांवर आरोप केले होते.