‘या’ अभिनेत्रीच्या तीन वर्षांच्या चिमुकलीला लागली वाइनची सवय !!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2017 10:41 AM2017-10-26T10:41:19+5:302017-10-26T16:11:53+5:30

काही दिवसांपूर्वीच या अभिनेत्रीने मुलांचा सांभाळ करायचा असेल तर कुत्रे पाळा असे धक्कादायक वक्तव्य केले होते, आता तिने पुन्हा एकदा असाच काहीसा धक्कादायक खुलासा केला आहे.

'The actress's three-year-old chimukula takes the habit of wine! | ‘या’ अभिनेत्रीच्या तीन वर्षांच्या चिमुकलीला लागली वाइनची सवय !!

‘या’ अभिनेत्रीच्या तीन वर्षांच्या चिमुकलीला लागली वाइनची सवय !!

googlenewsNext
लिवूड अभिनेत्री मिला कुनिस हिने काही दिवसांपूर्वीच म्हटले होते की, ‘मुलांचा चांगला सांभाळ करायचा असेल तर कुत्रे पाळा. कारण त्यामुळे मुलांचे चांगल्या पद्धतीने पालनपोषण करता येईल.’ मिला कुनिसच्या या वक्तव्यानंतर एकच खळबळ उडाली होती. आता तिने पुन्हा एक असाच खळबळजनक खुलासा केला. होय, मिला कुनिसने तिच्या तीन वर्षांच्या मुलीबद्दल सांगितले की, ‘माझी मुलगी व्यात हिला दर शुक्रवारी वाइन प्यायला आवडते.’ कदाचित हे ऐकायला विचित्र वाटत असले तरी, हे खरं असल्याचे कुनिसने सांगितले. 



आयएएनएसने फिमेलफर्स्ट वेबसाइटचा हवाला देताना याबाबतची माहिती दिली. मिला कुनिसने म्हटले की, ‘आम्ही आमच्या घरी ‘सब्बात’ (यहुदींचा दर आठवड्याला येणारा एक धार्मिक सण) साजरा करीत असतो. ‘सब्बात’मध्ये वाइन पिण्यास एक वेगळेच महत्त्व आहे. माझी मुलगी जन्माला आली तेव्हापासून वाइनची चव चाखत आहे. शुक्रवारी जेव्हा सकाळी मी माझ्या मुलीला आज शुक्रवार असल्याचे सांगते, तेव्हा त्या म्हणतात ‘आज मला वाइन पिण्यास मिळणार आहे.’
 

मिला कुनिसचा हा खुलासा धक्कादायक समजला जात असून, तिने मुलीला लावलेली सवय म्हणजे आश्चर्यच समजले जात आहे. दरम्यान, मिला कुनिस आगामी ‘अ बॅड मॉम्स क्रिसमस’ या चित्रपटात झळकणार असून, हा चित्रपट १० नोव्हेंबर रोजी रिलीज होणार आहे. ‘अ बॅड मॉम्स क्रिसमस’ हा मिला कुनिसचा पहिला सीक्वल चित्रपट आहे. मिला हॉलिवूड स्टार एश्टन कुचरची पत्नी आहे. ती ‘ब्लॅक स्वॅन’ आणि ‘फ्रेंड्स विद बेनिफिट्स’ या चित्रपटांमध्ये झळकली आहे. 

Web Title: 'The actress's three-year-old chimukula takes the habit of wine!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.