OMG ! सलमान खाननंतर 'या' गायिकेला शूटिंग दरम्यान सापाने केला दंश, थरारक क्षण झाला कॅमेऱ्यात कैद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2021 19:16 IST2021-12-27T13:55:24+5:302021-12-27T19:16:39+5:30

बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान (Salman khan)ला सपाने दंश केला. यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

After salman american singer maeta was bitten by a snake while-shooting video went viral on internet | OMG ! सलमान खाननंतर 'या' गायिकेला शूटिंग दरम्यान सापाने केला दंश, थरारक क्षण झाला कॅमेऱ्यात कैद

OMG ! सलमान खाननंतर 'या' गायिकेला शूटिंग दरम्यान सापाने केला दंश, थरारक क्षण झाला कॅमेऱ्यात कैद

अलीकडेच बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान (Salman khan)ला सपाने दंश केला. मात्र, सुदैवाने सलमानला दंश करणारा साप विषारी नव्हता. सलमानला रुग्णालयात दाखल केल्यानंतर 6 तासांनंतर डिस्चार्ज देण्यात आला. बॉलिवूडनंतर आता हॉलिवूडमध्येही अशीच एक घटना पाहायला मिळाली. वास्तविक, इंटरनॅशनल सिंगर Maeta  एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सगळ्यांनाच धक्का बसला.

पॉप सिंगला केला सापाने दंश
अलीकडेच पॉप सिंगरने त्याच्या एका फोटोशूटचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती फोटोशूट करताना दिसतेय.व्हिडिओमध्ये 21 वर्षीय Maeta कार्पेटवर झोपलेली दिसत आहे. .शूटसाठी ती सापासोबत पोज देताना दिसत आहे. दरम्यान, अचानक काळ्या रंगाचा साप त्याच्या हनुवटीवर दंश करतो.. सापाने दंश केल्याने  Maeta भयंकर घाबरते आणि लगेच त्याला उचलून फेकून देते. कॅमेराच्या मागील व्यक्ती म्हणतो- 'अरे सापाने तिला दंश केला.'

व्हिडिओ शेअर करताना Maetaने लिहिले की, 'तुम्हा सर्वांसाठी व्हिडिओ बनवण्यासाठी मला या गोष्टींमधून जावे लागेल.'  Maetaने हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करत 'पुन्हा कधीच नाही' असे लिहिले.  Maetaने गेल्या आठवड्यात तिचा हा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर केल्यापासून खूप व्हायरल होत आहे.

Web Title: After salman american singer maeta was bitten by a snake while-shooting video went viral on internet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.