एड्सने ग्रासलेल्या या अभिनेत्याजवळ जगण्यासाठी आहेत कमी दिवस, घर वाचवण्यासाठी करतोय प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2019 10:40 AM2019-04-23T10:40:37+5:302019-04-23T10:41:17+5:30

४९ वर्षीय हा स्टार एका जमान्यात छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध परीक्षक होता आणि त्या काळी टेलिव्हिजन जगतातील तो प्रसिद्ध व्यक्ती होता.

AIDS has survived the actor's life, few days, now is homeless | एड्सने ग्रासलेल्या या अभिनेत्याजवळ जगण्यासाठी आहेत कमी दिवस, घर वाचवण्यासाठी करतोय प्रयत्न

एड्सने ग्रासलेल्या या अभिनेत्याजवळ जगण्यासाठी आहेत कमी दिवस, घर वाचवण्यासाठी करतोय प्रयत्न

googlenewsNext


एगहेड्स क्विज शोचा स्टार सीजे डि मूई गेल्या कित्येक वर्षांपासून एड्स या आजाराने पी़डित आहे आणि आता त्याच्याकडे पैशांची कमतरता असल्यामुळे त्याला घर गहाण ठेवावे लागले आणि ते घर वाचवण्यासाठी तो प्रयत्न करतो आहे.  डॉट युकेच्या रिपोर्टनुसार, ४९ वर्षीय सीजे एका जमान्यात छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध शोचा परीक्षक होता आणि त्या काळी तो टेलिव्हिजन जगतातील प्रसिद्ध व्यक्ती होता. २००६ साली एका व्यक्तीने त्याच्यावर हत्या केल्याचा खोटा आरोप केल्यामुळे त्याला शोमधून काढून टाकण्यात आले होते. 


१९८८ साली सीजे डी मूईवर एम्स्टर्डममधील एका बेघर व्यक्तीची हत्या केल्याचा आरोप करण्यात आला होता आणि या प्रकरणात त्याला आर्थिक व मानसिकरित्या सामोरे जावे लागले होते. मात्र त्याच्यावरील आरोप मागे घेण्यात आले होते. पण, या सर्व गोष्टींमुळे त्याची अवस्था बिकट झाली होती. त्याला त्याचे घर गहाण ठेवावे लागले होते. त्यावेळी त्याच्या मदतीसाठी एक क्राऊड फंडींग मोहिम करण्यात आली होती. 




सीजे डी मूईने सांगितले की, मला ३० वर्षांपासून एड्स आहे. गेल्या तीन वर्षात मी खूप काही सहन केले. कारण माझ्याकडे कामदेखील नव्हते. बाहेरून मी स्वस्थ आहे. आताही मी धावतो आणि सकारात्मक राहून स्वतःला चांगले ठेवण्याचा प्रयत्न करतो आहे




सीजे डी मूईने लोकांचे आभार मानत सांगितले की, माझ्यावरील प्रेम दर्शविल्याबद्दल मी सगळ्यांचा आभारी आहे आणि जर  तुमच्यापैकी कोणाला माझ्या मदतीची गरज भासल्यास मला नक्की सांगा.

सीजे डी मूईने नुकतेच एक ट्विट केले आहे त्यात त्याने म्हटले की, त्याला वयाच्या १८ व्या वर्षी एड्सची लागण झाली होती. त्यावेळी मी सेक्स वर्कर म्हणून काम करत होतो. मला या गोष्टीची अजिबात लाज वाटत नाही. कारण मला जगण्यासाठी असे करावे लागले. 



सीजेचे ट्विटर अकाउंट त्याचे मित्र चालवतो. ज्याचे नाव जो आहे. जो त्याच्या चाहत्यांना सीजेच्या मदतीसाठी आवाहन करतो. या आवाहनांतर्गत आतापर्यंत ३३४८.७२ पाउंड जमले असून सीजेचे घर वाचवण्यासाठी मदत होणार आहे. तो सध्या काल्डीकोटमध्ये त्याचा सहकारी एंड्र्यू डोरानसोबत तीन वर्षांपासून राहतो आहे.


डिस्क्लेमर ः आधी दिलेल्या बातमीत सीजे डी मूई बेघर झाल्याचे म्हटले होते. मात्र लोकमतने केलेल्या पडताळणीनंतर असे निष्पन्न झाले की सीजेने घर गहाण ठेवले असून तो व त्याचा मित्र जो त्याचे घर वाचवण्यासाठी प्रयत्न करतो आहे. 

Web Title: AIDS has survived the actor's life, few days, now is homeless

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.