​अली फजलला मिळाली सोलो हीरो हॉलीवूड फिल्म?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2016 01:59 PM2016-12-01T13:59:42+5:302016-12-01T13:59:42+5:30

‘फुकरे’ स्टार अली फजलचे नशीब सध्या जोरात आहे. ‘व्हिक्टोरिया अँड अब्दुल’ या हॉलीवूड चित्रपटाची शूटींग संपवून तो ‘फुकरे २’साठी ...

Ali Fazal gets solo hero Hollywood movie? | ​अली फजलला मिळाली सोलो हीरो हॉलीवूड फिल्म?

​अली फजलला मिळाली सोलो हीरो हॉलीवूड फिल्म?

googlenewsNext
ुकरे’ स्टार अली फजलचे नशीब सध्या जोरात आहे. ‘व्हिक्टोरिया अँड अब्दुल’ या हॉलीवूड चित्रपटाची शूटींग संपवून तो ‘फुकरे २’साठी नुकताच भारतात परत आला आहे. सुत्रांचे असे म्हणने आहे की, त्याला दुसऱ्या हॉलीवूड फिल्मची आॅफर मिळाली आहे. आणि तीसुद्धा सोलो हीरो म्हणून.

आॅस्कर विजेती अभिनेत्री जुडी डेंचसोबत काम केल्यानंतर अली फजल ‘व्हिक्टोरिया अँड अब्दुल’ या सिनेमाच्या प्रिक्वेलमध्ये दिसण्याची शक्यता आहे. दिग्दर्शक स्टीफन फ्रीअर्सने प्रिक्वेलमध्ये केवळ अलीचे पात्र ‘अब्दुल’वर लक्ष केंद्रित करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. 

पहिल्या सिनेमात इंग्लंडची महाराणी व्हिक्टोरिया आणि अब्दुल यांचे नाते दाखवल्यावर अब्दुलचे लंडनला येण्यापूर्वी भारतातील आयुष्य कसे होते यावर हा प्रिक्वेल आधारित असेल.

पुढील वर्षी २२ सप्टेंबर रोजी ‘व्हिक्टोरिया अँड अब्दुल’ रिलीज झाल्यानंतर एका महिन्याने या दुसऱ्या चित्रपटाची शूटींग सुरू होईल. तत्पूर्वी जानेवारीपासून पटकथेवर काम सुरू होणार आहे.


व्हिक्टोरिया अँड अब्दुल : जुडी डेंच आणि अली फजल

अलीच्या अभिनयाने प्रभावित होऊन दिग्दर्शकाने त्याला दुसऱ्या चित्रपटात कास्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. अलीसारख्या नव्या दमाच्या कलाकारासाठी सध्या हाय-टाईम आहे. अलीने यापूर्वी ‘फास्ट अँड फ्युरियस ७’मध्ये छोटीशी भूमिका केलेली आहे.

म्हणजे आता इंग्लिश चित्रपटांत आपले नाव मोठे करणाऱ्या इरफान खान, अनुपम खेर, अनिल कपूर, प्रियांका चोप्रा, दीपिका पदुकोन, ओम पुरी अशा दिग्गजांच्या पंक्तीमध्ये अलीचासुद्धा समावेश करावा लागेल.

एवढेच नाही तर, हॉलीवूडच्या एका मोठ्या प्रोडक्शन कंपनीने अलीला एका स्पाय थ्रिलर चित्रपटाचसुद्धा आॅफर दिली आहे. क्या बात है अली, तेरी तो निकल पडी! 

Web Title: Ali Fazal gets solo hero Hollywood movie?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.