जॉनी डेपकडून केस हरल्यानंतर बदलला एम्बर हर्डचा सूर, म्हणाली - मी अजूनही त्याच्यावर प्रेम करते...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2022 06:22 PM2022-06-16T18:22:31+5:302022-06-16T18:22:53+5:30

Amber Heard : कोर्टाने 1 जून रोजी निर्णय जॉनी डेपच्या बाजूने दिला आणि एम्बर हर्डला 1 कोटी 50 लाख डॉलर नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले. या केसकडे जगभरातील लोकांची नजर होती.

Amber Heard after losing the case against ex husband Johnny Depp says I still love him | जॉनी डेपकडून केस हरल्यानंतर बदलला एम्बर हर्डचा सूर, म्हणाली - मी अजूनही त्याच्यावर प्रेम करते...

जॉनी डेपकडून केस हरल्यानंतर बदलला एम्बर हर्डचा सूर, म्हणाली - मी अजूनही त्याच्यावर प्रेम करते...

googlenewsNext

हॉलिवूड अभिनेता जॉनी डेप (Johnny Depp) आणि एम्बर हर्ड (Amber Heard) या दोघांची मानहानी केस सुर होती. जॉनी डेप ही केस जिंकला. कोर्टाने 1 जून रोजी निर्णय जॉनी डेपच्या बाजूने दिला आणि एम्बर हर्डला 1 कोटी 50 लाख डॉलर नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले. या केसकडे जगभरातील लोकांची नजर होती. यामुळे या दोन्ही कलाकारांची पर्सनल लाइफही समोर आली. आत इतकं होऊनही एम्बर हर्डने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत जॉनी डेपवरील आपलं प्रेम व्यक्त केलं. 

एम्बरने एनबीसीला दिलेल्या मुलाखतीत जॉनी डेपबाबत वक्तव्य केलं. अभिनेत्री म्हणाली की, 'आपलं नातं वाचवण्यासाठी तिने खूप काही केलं आणि मी अजूनही त्याच्यावर प्रेम करते. मी मरेपर्यंत जबाबातील प्रत्येक शब्दावर कायम राहणार. मी खूप चुका केल्या आहेत, पण मी नेहमी खरं बोलले'.

एम्बरने पुढे सांगितलं की, 'त्याच्या वकिलांनी ज्युरींचं लक्ष मुख्य मुद्द्यांवरून हटवण्यासाठी चांगलं काम केलं. ही आतापर्यंतची सर्वात वाईट बाब आहे. मी माझ्या नात्यात अनेक चुकीच्या गोष्टी बोलले आणि मी हॉरिबल प्रकारे वागले. मी त्याच्यावर प्रेम करते आणि मी त्याच्यावर पूर्ण मनापासून प्रेम करत होते. मी पूर्ण प्रयत्न केला की, हे नातं टिकावं. पण हे नातं वाचू शकलं नाही'.

एम्बरने जॉनीवर आरोप लावला होता की, तो तिच्यासोबत चुकीचा व्यवहार करत होता. हे आरोप खोटे असल्याचं सांगत त्याने एक्स वाइफ एम्बर हर्डवर मानाहानीची केस केली होती. अमेरिकेत ही केस फारच चर्चत राहिली. जगभरातील लोक त्यांच्याबाबत वाचत होते. या केसचं टीव्हीवर प्रसारण करण्यात आलं होतं. ही केस जिंकल्यानंतर जॉनी आनंदी झाला होता आणि त्याने आपल्या मित्रांसोबत पार्टी केली होती.

Web Title: Amber Heard after losing the case against ex husband Johnny Depp says I still love him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.