प्रसिद्ध अभिनेत्रीला स्किन कॅन्सरचं निदान, सर्जरीनंतर शेअर केला हॉस्पिटलमधील फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2024 02:54 PM2024-03-15T14:54:19+5:302024-03-15T14:56:56+5:30

कॅन्सरचं निदान झाल्यानंतर प्रसिद्ध अभिनेत्रीवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

americal actress Christie Brinkley undergoes surgery after diagnosed with skin cancer shared post | प्रसिद्ध अभिनेत्रीला स्किन कॅन्सरचं निदान, सर्जरीनंतर शेअर केला हॉस्पिटलमधील फोटो

प्रसिद्ध अभिनेत्रीला स्किन कॅन्सरचं निदान, सर्जरीनंतर शेअर केला हॉस्पिटलमधील फोटो

अमेरिकन अभिनेत्री आणि मॉडेल क्रिस्टी ली ब्रिंकले हिला स्किन कॅन्सरचं निदान झालं आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे. यामुळे अभिनेत्रीचे चाहते चिंतेत आहेत. पण, वेळीच कॅन्सरचं निदान झाल्याने क्रिस्टी लीने उपचार घेतले आहेत. कॅन्सर असल्याचं समजल्यानंतर क्रिस्टी लीवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत तिने याबाबत एक पोस्ट लिहिली आहे. 

क्रिस्टी ली हिला बेसल सेल कार्सिनोमा या स्किन कॅन्सरचं निदान झालं होतं. तिच्या चेहऱ्यावरील तेवढा भाग काढून टाकण्यात आल्याचं अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोमध्ये दिसत आहे. क्रिस्टी ली लेकीचं चेकअप करण्यासाठी डॉक्टरकडे गेली होती. अभिनेत्रीच्या चेहऱ्यावर छोटे छोटे डाग होते. डॉक्टरांना दाखवल्यानंतर त्यांनी क्रिस्टी ली हिला कॅन्सर असल्याचं सांगितलं. त्यानंतर चेहऱ्यावरील कॅन्सरने प्रभावित झालेला भाग सर्जरी करून काढून टाकण्यात आला आहे. क्रिस्टी लीने या पोस्टमधून डॉक्टरांचे आभार मानले आहेत. 

कॅन्सरपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी क्रिस्टी लीने काही उपाय सांगितले आहेत. सुरुवातीला हे गांभीर्याने घेतलं नव्हतं पण आता रुटीन बदलल्याचं क्रिस्टी लीने पोस्टमध्ये म्हटलं आहे. आता पूर्ण अंग झाकेल असे कपडे वापरत असल्याचं ती म्हणते. त्याबरोबरच SPF 30 सनस्क्रीन वापरत असल्याचंही क्रिस्टी लीने म्हटलं आहे. 

क्रिस्टी लीने सुप्रसिद्ध मॉडेल आहे. जवळपास ५०० हून अधिक मॅगजीनच्या कव्हर पेजवर ती झळकली आहे. १९८३ मध्ये तिने अभिनयात पदार्पण केलं. National Lampoon's Vacation, 'वेगस वेकेशन' अशा सिनेमांमध्ये तिने काम केलं आहे. त्याबरोबरच अनेक टीव्ही सीरिज आणि म्युझिक व्हिडिओतही ती झळकली आहे. 
 

Web Title: americal actress Christie Brinkley undergoes surgery after diagnosed with skin cancer shared post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.