हॉलिवूडच्या रिहानाने बॉलिवूडचं मार्केट खाल्लं! अनंत अंबानी-राधिकाच्या प्री वेडिंग सोहळ्यात गाण्यासाठी मिळाले तब्बल 'इतके' कोटी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2024 12:05 PM2024-03-01T12:05:43+5:302024-03-01T12:08:19+5:30
Anant Ambani-Radhika Merchant Wedding: लेकाच्या प्री वेडिंग सोहळ्यात गाण्यासाठी अंबानींनी रिहानाला दिले तब्बल 'इतके' कोटी
भारतातील सुप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या घरी सनई चौघडे वाजत आहेत. अंबानींचा धाकटा लेक अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. गुजरातमधील जामनगर येथे त्यांच्या प्रीवेडिंग फंक्शनला सुरुवात झाली आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्रीवेडिंग सोहळ्यासाठी अख्खं बॉलिवूड अवतारलं आहे. अनेक सेलिब्रिटींनी या सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आलं आहे. हॉलिवूड पॉप स्टार सिंगर रिहानादेखील अनंत-राधिकाच्या प्रीवेडिंग सोहळ्यासाठी गुजरातमध्ये दाखल झाली आहे.
अनंत अंबानींच्या प्रीवेडिंग सोहळ्यात रिहाना गाणंही गाणार असल्याचं समजत आहे. आणि यासाठी अंबानींना तिला मोठी रक्कमही दिली आहे. अनंत अंबानी-राधिकाच्या प्रीवेडिंग सोहळ्यात गाणं गाण्यासाठी अंबानींनी रिहाना तब्बल ५ मिलियन डॉलर इतकी रक्कम मोजली आहे. भारतीय रुपयानुसार, या सोहळ्यासाठी पॉप स्टार रिहानाला ४१ कोटी रुपये मिळणार आहेत. याआधीही अंबानींनी लेक ईशा अंबानीच्या लग्नात गाणं गाण्यासाठी रिहानाला ६ मिलियन डॉलर दिले होते. अंबानींच्या लग्नात भारतात येऊन रिहानाने बॉलिवूडचं अख्खं मार्केट खाल्लं आहे. त्यामुळे ती चर्चेत आली आहे.
रिहाना याआधी शेतकरी आंदोलनाबाबत केलेल्या ट्वीटमुळे चर्चेत आली होती. केंद्र सरकारने आणलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी विरोध केला होता. एकीकडे शेतकरी मागे हटण्यास तयार नव्हते, तर दुसऱ्या बाजूला सरकारही आपल्या भूमिकेवर ठाम होतं. यादरम्यान रिहानाने शेतकऱ्यांच्या आंदोलन समर्थनार्थ ट्विट केलं होतं. रिहानाच्या या ट्विटची जगभर चर्चा झाली होती.
दरम्यान, अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री वेडिंग सेलिब्रेशनसाठी अनेकजण जामनगरला येत आहेत. या सोहळ्याला देशातीलच नव्हे तर विदेशातीलही अनेक पाहुणे उपस्थित राहणार आहेत. फेसबुकचे मार्क झकरबर्ग, मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स ते गुगलचे सुंदर पिचई असे झाडून सर्व बडे बडे उद्योगपती, उद्योजक या सोहळ्याला उपस्थिती लावणार आहेत. १ ते ३ मार्च असा हा तीन दिवसांचा सोहळा असणार आहे.