तर काय राजकारणात येणार अँजोलिना जोली?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2019 03:15 PM2019-01-02T15:15:00+5:302019-01-02T15:15:01+5:30
हॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री अँजोलिना जोली हिला कोण ओळखत नाही. हॉलिवूडमध्ये अँजोलिनाने स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे आणि आता कदाचित राजकारणातही अँजोलिना येणार, असे दिसतेय.
हॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री अँजोलिना जोली हिला कोण ओळखत नाही. हॉलिवूडमध्ये अँजोलिनाने स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे आणि आता कदाचित राजकारणातही अँजोलिना येणार, असे दिसतेय. होय, अलीकडे बीबीसी टुडेच्या एका कार्यक्रमात अँजोलिनाने राजकारणात येण्याचे अप्रत्यक्ष संकेत दिलेत. या कार्यक्रमात जस्टिन वेब या मुलाखकर्त्याने अँजेलिनाला राजकारणात येण्याबद्दलचा इरादा विचारला. कधीकाळी अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढशील, असे वाटते का? असा प्रश्न वेबने अँजोलिनाला केला. यावर अँजोलिना म्हणाली की, २० वर्षांपूर्वी तू मला हा प्रश्न विचारला असता तर कदाचित मी त्यावर हसले असते. पण आता मात्र जिथे कुठे माझी गरज असेल, तिथे मी जाणार, असे मी म्हणेल. राजकारणात मी फिट बसत असेल तर मी तिथेही जाईल. ती इथेच थांबली नाही तर, ‘मी सरकारसोबत काम करण्यासही सक्षम आणि लष्करासोबतही. पण तूर्तास मी यावर शांत राहणे पसंत करेल,’ असे ती म्हणाली.
तिच्या या उत्तरानंतर वेबने आणखी एक प्रश्न केला. म्हणजे, राष्ट्राध्यक्षपदासाठीच्या नामांकनाच्या यादीत तुझे नाव असू शकते? असे त्याने विचारले. त्याच्या या प्रश्नाला थेट उत्तर देणे तिने टाळले. पण याला ना नकार दिला ना होकार. ऊलट अँजोलिनाने वेबचे आभार मानलेत.
आता अँजोलिना खरोखरचं राजकारणात येणार की नाही, ते भविष्यात कळेलच. पण तूर्तास तरी तिने दिलेली उत्तरे बघता, राजकारणात ती फिट बसणार, असेच दिसतेय.